उमेद हरवलेली मुलं.....
साहिलच्या चेहर्याकडे पाहून त्याच्या आईला गलबलून आलं. पुन्हा तेच. काय केलं की हे थांबेल हेच समजत नव्हतं. गेला महिनाभर सातवीतला साहिल शाळेतून आला की त्याचा अस्वस्थणा, चिडचिड, आदळआपट यातून त्याला बाहेर कसं काढायचं ते पालकांना उमजत नव्हतं. आजूबाजूला घडणार्या, वर्तमानपत्र, दूरदर्शनवर पाहिल्या जाणार्या आणि भारतीयांच्या बाबतीत असं काही घडत नाही असा समज असणार्या या गोष्टी आता त्यांच्याही घरात शिरल्या होत्या. मुल चिडवतात, गे, फॅगेट, स्टुपिड इंडियन, गो बॅक टू इराक, गळा आवळू आम्ही तुझा, लांब राहा आमच्यापासून, विचित्रच आहेस असं एक कुणीतरी म्हणतं आणि बाकिचे त्याला साथ देतात.