#FrenchOpen

भल्याभल्यांसाठी आव्हान ठरणारं रोलँ गॅरोस

Submitted by पराग१२२६३ on 4 June, 2024 - 13:21

पॅरीसमधील रोलँ गॅरोस टेनिस संकुलात (Roland Garros Tennis Complex) यंदाच्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू झालेली आहे. क्ले कोर्टवर खेळवली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. इथल्या लाल मातीची कोर्ट्स अग्रमानांकितापासून बिगरमानांकित खेळाडूंची कायमच शारीरिक, मानसिक कसोटी पाहत आलेली आहेत. त्यामुळे रोलँ गॅरोस संकुलातील मध्यवर्ती कोर्ट असलेल्या फिलीप चॅर्टिएर कोर्टावर (Philippe Chartier) आजवर अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळालेले आहेत. 14 वेळा ही स्पर्धा जिंकणारा स्पॅनिश टेनिसपटू राफाएल नादाल 2024 च्या स्पर्धेत पहिल्या फेरीतच बाहेर पडला आहे.

Subscribe to RSS - #FrenchOpen