कथाशंभरी - हे भगवान!
Submitted by छन्दिफन्दि on 6 September, 2022 - 15:17
लक्ष्मी लग्नानंतर मुंबईला राहायला आली. नवीनच ओळखी झल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी.
शेजारीच अजून एक छोटी बिल्डिंग होती. त्यांची स्वयंपाकघराची खिडकी लक्ष्मी च्या स्वयंपाकघराच्या खिडकीसमोरच होती.
सकाळी चहा करताना समोरच्या घरातून काकांचा आवाज येई
"भगवान दूध घे. " " भगवान चहा घे ." "भगवान पाव घे "
त्या कुटुंबाशी जास्त ओळख नव्हती तरी त्या काकांच्या खानपानाची कीर्ती तिच्यापर्यत आली होती.
"काय लोकं असतात एकेक, सकाळी सकाळी उतरलेली नसते तरी आपलं देवापुढे उभं राहायचं. नीट उतरू तरी द्यायची ना आधी. देवाला काय तर म्हणे चहा आणि ब्रेड घे "
विषय: