हस्तलेखन स्पर्धा ...मोठा गट ... मायबोली आयडी ...मनीमोहोर
Submitted by मनीमोहोर on 3 September, 2022 - 05:22
आम्ही साधारण आठवी नववी मध्ये असताना आमच्या सगळ्या पाठ्य पुस्तकात पहिल्या पानावर ही प्रतिज्ञा छापण्यास सुरवात झाली.
तसेच मग ती आमच्या प्रार्थनेचा ही भाग झाली. आमची शाळा लहान गावातली होती , शाळेला मोठा चौक होता. तिथे सगळ्या मुली एकत्र जमून रोज प्रार्थना आणि ही प्रतिज्ञा होत असे. एक जण कोणीतरी सांगत असे आणि बाकीच्या मुली तिच्या मागून एकदम मोठ्या आवाजात म्हणत असत. प्रतिज्ञा सांगायला मिळणं म्हणजे मानच वाटे तेव्हा मोठा.
विषय:
शब्दखुणा: