ओला / उबेर सर्विस नाशिक
Submitted by दिव्या१७ on 15 April, 2022 - 02:48
नाशिक ला सुट्टी साठी आलो आहोत, इथून वणी गड जायचा प्लॅन आहे, आउटस्टेशन किंवा नाशिक वरून कधी ओला उबेर नाही केले, तर ओला किंवा उबेर ची नाशिक ते वणी गड सर्विस कुणी वापरली आहे का? किंवा ओव्हरऑल उबेर ओला सर्विस कशी आहे नाशिक मध्ये? सोबत जेष्ठ नागरिक आणी मुले आहेत तर ओला करावी का? अजून काही चांगल्या टूर companies आहेत का. कोणाचा अनुभव असेल तर प्लीज सांगा.
ओला app वर चेक केले तर वन वे ट्रिप २५३९ रुपये आणी राऊंड ट्रिप सकाळी ९ वाजता निघून ६ पर्यंत रिटर्न ला २६६२ रुपये, राऊंड ट्रिप वन वे पेक्षा फक्त १२३ रुपयाचा फरक, काही हेडन चार्जेस असतात का ओला चे?
शेअर करा