ओला / उबेर सर्विस नाशिक

Submitted by दिव्या१७ on 15 April, 2022 - 02:48

नाशिक ला सुट्टी साठी आलो आहोत, इथून वणी गड जायचा प्लॅन आहे, आउटस्टेशन किंवा नाशिक वरून कधी ओला उबेर नाही केले, तर ओला किंवा उबेर ची नाशिक ते वणी गड सर्विस कुणी वापरली आहे का? किंवा ओव्हरऑल उबेर ओला सर्विस कशी आहे नाशिक मध्ये? सोबत जेष्ठ नागरिक आणी मुले आहेत तर ओला करावी का? अजून काही चांगल्या टूर companies आहेत का. कोणाचा अनुभव असेल तर प्लीज सांगा.

ओला app वर चेक केले तर वन वे ट्रिप २५३९ रुपये आणी राऊंड ट्रिप सकाळी ९ वाजता निघून ६ पर्यंत रिटर्न ला २६६२ रुपये, राऊंड ट्रिप वन वे पेक्षा फक्त १२३ रुपयाचा फरक, काही हेडन चार्जेस असतात का ओला चे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

१. नाशिक ते वणी गड सर्च न करता, नाशिक ते सप्तशृंगगड असं सर्च करा. ते कधीही ॲक्कुरेट असेल.
२. जर तुम्ही ओला किंवा उबर वन वे ट्रीप घेतली, तर तुम्हाला गडावर गाडी रिलीज करावी लागेल (असा माझा अंदाज) आणि तिथे ओला किंवा उबर ची सर्विस नाही, परत येण्यासाठी. त्यामुळे अडकून पडाल.
३. सध्या चैत्रोत्सवामुळे अफाट गर्दी असल्याने खासगी गाड्यांना गडावर बंदी आहे. त्यामुळे खासगी वाहन फक्त नांदुरी पर्यंत अलावूड असून तिथून फक्त महामंडळ चा बसेसच गडावर जातात. (नांदुरी हे गडाच्या पायथ्याशी वसलेले गाव)
४. सध्या दर दोन मिनिटांनी २४ तास नाशिक CBS येथून बस सुटतात व त्या डायरेक्ट गडावर नेतात, आणि गडावरून सुद्धा बसेस आहेत, प्रत्येक दोन मिनिटांनी नाशिक साठी.
५. चैत्रोत्सव गर्दीमुळे ट्रॅफिक वेटींग + आदर चार्जेस वाढू शकतात!
६. Hope this will help! Welcome to our city!!! Happy Journey!

नाशिक ओला उबेरचे माहिती नाही
पण या २-३ दिवसात न गेल्यास उत्तम.
आठवड्याचा शेवट, जोडून आलेल्या सुट्ट्या, करोना निर्बंध शिथिलता आणि चैत्र पौर्णिमा यामुळे प्र चं ड गर्दी असेल.

चैत्र पौर्णिमा उत्सव असतो + मंदिराचा ध्वज बदलणे वगैरे परंपरा आहेत -- त्यामुळे भरपूर भाविक, राजकीय शक्तीप्रदर्शन, रेटारेटी, सोयींचा बोजवारा, अवाच्या सव्वा किंमती हे सर्व अटळ आहे. लहान मुले, वयस्क यांना नेण्याजोगा हा काळ नाही. निवांत दर्शन होणार नाही.
आहात तिथे स्थानिकांकडे चौकशी करून मग पुढच्या आठवड्यात, मधल्या वारी, गर्दी ओसरल्यावर जाता येईल.

७२६२०२५०२५
९७६३७९१६५३
८८८८७८२८२४
सर्व चांगले आहेत