शशक पूर्ण करा - सो ऽहम् - हर्पेन
Submitted by हर्पेन on 16 September, 2021 - 02:24
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
उघडला गेल्यावरच कळतंय की तेथे दरवाजाही होता.
तिकडून पाझरतोय सौम्य असा प्रकाश.
चांदण्यापेक्षा जरासा जास्त; पहाट वेळेची आठवण करून देणारा.
अवधान दिले असता ऐकू येतोय खर्जातला अनाहत नाद.
झुळझुळ पाण्याच्या आवाजात जेमतेम ऐकू येईल असा
हवेच्या झुळुकीसोबत स्वार होऊन येतोय मंद सुखद सुगंध.
हृदयात हलकीशी हवीहवीशी कळ उठवणारा.
विषय:
शब्दखुणा: