आर्थिक कल

येत्या आर्थिक वाढीचा कसा फायदा करून घेता येईल?

Submitted by अजय on 2 April, 2021 - 11:45
nasdaq chart

येत्या काही महिन्यात अमेरिकेत अभूतपूर्व आर्थिक वाढ अपेक्षित आहे. महामारी संपण्याची लक्षणे दिसू लागली आहे. अमेरिकन ग्राहकाकडे कधी नव्हे इतकी बचत आणि क्रयशक्ती जमली आहे आणि तो खर्च करायला उत्सुक आहे. त्यातच नुकतीच १.९ ट्रिलियन डॉलर्सची भर बायडन सरकारने घातली आहे. त्यात अजून भर घालण्याचे प्रयत्न चालू आहेत पण ते तूर्तास बाजूस ठेवू . पण त्या शिवायही वाढ अपेक्षित आहेच. आजच्याच आकडेवारीनुसार बेकारी निश्चिच कमी होते आहे. बेकारी (किंवा नोकर्‍यांची वाढ ) हे आकडे मागून येणारे सूचक (लॅगिंग ईडीकेटर) समजले जातात. म्हणजे आर्थिक वाढ आधिच सुरु झाली आहे.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आर्थिक कल