डाॅ.अनिल अवचटांचे मला आवडलेले पुस्तक: माझी चित्तरकथा
Submitted by sariva on 28 February, 2020 - 21:50
खरं तर डाॅ.अनिल अवचटांची सर्वच पुस्तकं मला आवडतात.पण अगदी अलिकडे वाचलेल्या त्यांच्या 'माझी चित्तरकथा' बद्दल लिहावं असं वाटलं.त्यांच्या इतर साध्यासुध्या पुस्तकांपेक्षा दिसायला देखणे असलेले,चांगल्या दर्जाच्या गुळगुळीत कागदावर छापलेले व डॉ.अवचटांच्या सुंदर चित्रांनी मुखपृष्ठ,मलपृष्ठ यांसह अंतर्बाह्य नटलेले हे छानसे पुस्तक.चित्तरकथा हे नाव सार्थ करणारे.शब्दांचे काम एक बोलके चित्रच करते असं म्हणतात.मग कथा कसली?तर केवळ स्वतःच्या आनंदासाठी, विरंगुळा म्हणून बालपणापासून ते आता मोठेपणापर्यंत स्वतःला हवी तेव्हा,हवी तशी...त्यांच्या दृष्टीने निरूद्देशपणे त्यांनी चितारलेल्या चित्रांची!पुस्तकांत भरपूर चित
शब्दखुणा: