२९ डिसेंबर २०१० अश्विनीमामी गटग, पुणे
Submitted by आशूडी on 30 December, 2010 - 03:38
हैद्राबादहून मायबोलीकर अश्विनी खाडिलकर (अश्विनीमामी, अमा) पुण्यात येणार असल्याने चिनूक्सने २९ डिसेंबरला म्हात्रेपुलाजवळ मल्टिस्पाईस इथे संध्याकाळी गटग आयोजित केले. त्याबद्दल "सारखं सारखं मल्टिस्पाईसच का?" याचं उत्तर त्याने शिताफीने न देऊन गटग तेथेच होणार असल्याचे पक्के केले. थोर माणसांच्या यशाचे गमक नंतरच उमगते. उद्योजक गटग '५ ते ७' होऊन निरुद्योजक (!?) नको, उद्योजकांचे आधारस्तंभ (!) गटग मात्र '७ पासून पुढे' ठेवण्यात आले होते. या अमर्यादित वेळेवरुन नोकरदारांची मुस्कटदाबी कशी होत असेल हे सूज्ञांच्या लक्षात येईलच.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा