निसर्गातील अनेक आवाज आपण रोज ऐकत असतो . वाहत्या पाण्याचा , वाऱ्याचा ,वाहनांचा , प्राण्यांचा माणसांचा रेडिओ चा विजांचा तर कधी पावसाचा इत्यादी अनेकविध आवाज या अगदी रोजच्या जीवनक्रमातल्या घटना . पण आता वेळ आली आहे त्या पलीकडे जाऊन विश्वातील काही घटनांचा आवाज ऐकण्याची! कसा ?ते मला समजलंय त्या शब्दात सांगायचा हा छोटासा प्रयत्न .
कॅनडा, नॉर्थ अमेरिका मधे हिवाळा इतर भागांच्या तुलनेने नेहेमीच जास्त काळ असतो आणि तापमान मोठा काळ -२० से. पेक्षा कमी असते. थोडक्यात वर्षातले जवळपास पाच -सहा महिने घरे अगदी कडेकोट बंदिस्त असतात. अशा वेळी घरांमधे रेडॉन वायूचे प्रमाण वाढलेले असण्याची शक्यता असते. हे झाले घरांच्या बाबत. आता व्यावसाय क्षेत्राकडे, जगातले उच्च दर्जाचे युरेनियम साठे, अत्यंत मोठ्या प्रमाणात सस्कात्चेवान प्रांतात आहेत. खोल जमिनीत खाणीत (underground mining) काम करणारे कामगार यांना देखिल बंदिस्त वातावरणात काम करावे लागते. अशा वातावरणात जास्त काळ राहिल्यास त्यापासुन मानवी शरिराला घातक असा फुफ्फुसाचे विकार निर्माण होतो.
जीन वाइग्नरने रिचर्ड फाइनमनबद्दल बोलताना म्हटले होते "He's another Dirac. Only this time human.".
फाइनमनमधला हा ह्युमन असण्याचा गूण फार मोलाचा होता. आयुष्यभर या माणसाचे कुतुहल शमले नाही, जाणून घेण्याची आस संपली नाही आणि लहान मुलासारखे हसू मिटले नाही.
आइन्स्टाइनच्या रिलेटिव्हिटीचा सिद्धांत e = mc2 हा त्याच्या सौंदर्याकडे न पाहता ५गुणांसाठी सिद्धता पाठ करणार्या लोकांपैकी मी एक. तेव्हा फाइनमनच्या संशोधनाबद्दल लिहिण्याची माझी योग्यता नाही. मात्र फाइनमनवद्दल व त्याने लिहिलेल्या व त्याच्यावर लिहिलेल्या काही पुस्तकांची ओळख इतपतच या लेखाची मर्यादा असणार आहे.
सूर्यमालेच्या निर्मितीच्या अनेक थियरीज आजवर मांडल्या गेल्या. अर्थात हि सगळी हायपोथेसिस असतात (कि ज्यातून निर्माण झालेले फोर्म्युले आणि सध्याची निरीक्षणे जुळावी लागतात). पैकी "नेब्युलर हायपोथेसिस" हे संशोधकांमध्ये सर्वात जास्त स्वीकारले गेलेले हायपोथेसिस आहे.
हिग्स बोसॉन: विश्वनिर्मितीमधील मुलभूत अद्भुत कणांची ओळख