विजय मल्ल्या प्रकरण: अरुंधती भट्टाचार्य व इतर बँक अधिकारी नामानिराळे कसे?
Submitted by इनामदार on 8 January, 2019 - 02:13
कायद्यात बदल केल्याने विजय मल्ल्याच्या भारतातील मालमत्ता गोठवून त्यातून कर्जाची रक्कम वळती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशा स्वरूपाच्या बातम्यांतून आजकाल विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुळात हे प्रकरण "मल्ल्याने बँकेकडून कर्ज घेतले आणि ते फेडले नाही" इतके सोपे नाही. अन्यथा इतका गदारोळ झालाच नसता. व्यक्तीला दिले जाणारे कर्ज आणि कंपनीला दिले जाणारे कर्ज ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्यपणे आपण जे गृहकर्ज वगैरे घेतो ते व्यक्तीला दिलेले कर्ज असते आणि त्याची परतफेड झाली नाही तर बँक कायदेशीर कारवाई व्यक्तीवर (आपल्यावर) करते.
शब्दखुणा: