अस्वस्थ न्यायव्यवस्था?
Submitted by अँड. हरिदास on 13 January, 2018 - 03:01
आपल्या भारतात फार पूर्वी रामराज्य का काय होते म्हणतात. तशीच स्थिती सांप्रतकाली पुन्हा भारतास प्राप्त झालेली आहे. ह्या घडीस भारतात कोणी गुन्हेगारच राहिलेला नसल्याचे शुभवर्तमान वेळोवेळी जनतेला मिळेल, ह्याची पुरेपूर खात्री नियंत्याने सध्या घेतलेली दिसते. 'आम्हाला काम मिळू द्या, काम न होता पगार मिळण्याचे दुर्भाग्य आमुच्या भाळी नको' अशी आर्त विनवणी पोलिस, वाहतूक नियंत्रक इ. इ. यंत्रणा रस्तोरस्ती उभी राहून मायबाप सरकारकडे करत असतात.