गणेशोत्सव २०१० स्वयंसेवक घोषणा
Submitted by रूनी पॉटर on 27 July, 2010 - 15:49
मायबोली गणेशोत्सव २०१० साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी संयोजक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच कार्यक्रम आयोजित करणे, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.