खरं तर रोजच व्यायाम करायला हवा. मागच्या आठवड्यापासुन (पुन्हा एकदा) जिम सुरु केलाय. पण शेजारी अगम्य (कोरियन) भाषा बोलणारे लोकं. काय करावं आणि काय करु नये याबद्दल कसलही मार्गदर्शन नाही. जुन्या instructor च्या सुचना आणि टिप्स पाळतोय.
मागे कधीतरी झेन टू डन् बद्दल इथे वाचलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, एखाद्या कृतीचं सातत्य राखायचं असेल तर ती कृती आपण करतोय, हे जास्तीतजास्त लोकांना सांगावी, म्हणजे समविचारी मंडळी एकत्र आली की हुरुप येतो आणि उत्साहही वाढतो, म्हणुन इथे लिहितोय.
व्यायाम हा एकंदरितच आजकालचा `हॉट टॉपिक' आहे. तरूण आहात, तर तारुण्य खुलवण्यासाठी व्यायाम; मध्यमवयीन आहात, तर तारुण्य टिकवण्यासाठी व्यायाम; वृद्ध आहात, तर फिट राहण्यासाठी किंवा, पाय, गुडघे, पाठ दुखू लागली आहे, म्हणून व्यायाम; श्रीमंत आहात, मग शो-ऑफ साठी व्यायाम; गरीब आहात, तर मग असाही काबाडकष्ट करून व्यायामच; अभिनेता/अभिनेत्री व्हायचंय, तर इंडस्ट्री ट्रेंड आणि डिमांड म्हणून व्यायाम; लग्नेच्छुक आहात, तर लग्न पटकन जमावं म्हणून छान दिसण्यासाठी व्यायाम; रोज व्यायाम, अधून मधून व्यायाम, कुणी सांगितलं म्हणून व्यायाम, आपल्याला वाटलं म्हणून व्यायाम...
काल आमचा मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या होत्या. महत्वाच्या विषयावर गाडी आलीच्......जवळपास सर्वच जणींची दुखरी नस्..वाढलेले वजन्...ओघानेच सध्याची जिम्स व त्यांचे बरे वाईट अनुभव कथनही झाले. बर्याच नव्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. जाहिराती पाहून आपण जिम लावतो व नंतर जर काही कारणाने वजन उतरले नाही तर बरेचदा स्वतःला दोषी ठरवतो व "झाकली मुठ सव्वा लाखाची"..झाकलेलीच रहाते. बर्याच गोष्टी लोकांपुढे येतच नाहीत. हा धागा तुम्हा-आम्हाला आलेल्या जिम्स्च्या अनुभवांची देवाण घेवाण करण्याकरता.....