‘इधर के’ आणि ‘उधर के’
Submitted by अश्विनी के on 18 January, 2016 - 00:43
नुकतीच पासपोर्टच्या व्हेरिफ़िकेशनसाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. डॉक्युमेंट्स दिल्यावर तिथल्या माणसाने त्यांच्या मोठ्या साहेबांच्या सहीसाठी २ तासांनी परत यायला सांगितलं. पण जा-जा ये-ये करण्यात वेळ गेला असता, शिवाय या कामासाठी रजा काढलीच होती, तर तिथेच थांबावं असं मी ठरवलं. पोलीस स्टेशनचं नवीन बांधकाम झालेलं दिसत होतं. पासपोर्ट व्हेरीफिकेशनचा विभाग पोलीसस्टेशनच्या सर्वसाधारण विभागांपासून वेगळा काढलेला होता. त्यामुळे जागा भरपूर होती, बसायला बाकंही होती. तिथे काही बायका-पुरुष बसलेले होते.
विषय:
शब्दखुणा: