सकाळी सेल्फी अपलोड केलेल्या कन्यांना मैत्रिणीची साद
Submitted by खडी साखर on 2 August, 2015 - 02:18
( .आपल्या सख्यांना आवाहन करणा-या नायिकेच्या नजरेतून )
मूळ रचनाकर्त्यांची क्षमा मागून.....
सेल्फिकन्यांनो, परत फिरू गं, चित्रांकडे अपुल्या
तिन्हीसांजा जाहल्या
दहा दिशांनी आला असेल लाईकांचा पूर
अशा अवेळी असू नका गं खात्यापासुन दूर
प्रतिसाद आले किती मनोहर चिंता मज लागल्या
इथे जवळच्या पीसीवरती, आहो आम्ही बाई
अजून आहे रतीब इकडे, पाऊस सरला नाही
शेळ्या, मेंढ्या अजुन कुठे ग, गळाकडे अडकल्या
अवतीभवती असल्यावाचुन कोलाहल तुमचा
उरक न होतो आम्हां आमुच्या कधिही कामाचा
या राजांनो, या रे लौकर, पोष्टी अंथरल्या
- खसा
विषय:
शब्दखुणा: