प्रतिष्ठा,...
आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी
प्रतिष्ठा सदैव पेलावी लागते
प्रतिष्ठा जपण्यासाठी कधी
प्रतिष्ठा पणालाही लावावी लागते
प्रतिष्ठा अशी जपली जावी की
प्रतिष्ठेची कधीच चेष्ठा नसावी
प्रतिष्ठा आपली असली तरी
त्यावर इतरांचीही निष्ठा असावी
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
भीमा,...
अनिष्ट रुढी अन् परंपरांशी
दिलास भीमा तु लढा
माणसांना दिलं माणूसपण
देऊन जातियतेलाही तडा
जरी पीचला होता समाज हा
विषमतेच्या जुलमामुळे
तरी भारत समतेनं वागतोय
भिमा तुझ्या जन्मा मुळे,...
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
बाबासाहेब,...
सामाजिक सुधारणेचा तो
त्रिकालबाधीत धैर्य होता
विद्वानाच्याही विद्वानांचा
भिमराव ज्ञानसुर्य होता
अनिष्ट रूढींचा र्हास होता
सामाजिक क्रांतीचा ध्यास होता
अरे ना झाला ना होईल कधी
असा बाबासाहेबांचा इतिहास होता
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
ज्योतिबा,...
ज्योतिबा तुमच्या विचारांनी
आजही समाज घडतो आहे
तुमच्या ज्ञान ज्योतिचा प्रकाश
मना-मनात वाढतो आहे
आज पुरूषा बरोबर स्रीया
समानतेनं वागु लागल्यात
सामाजिक धूरा संभाळत
सन्मानानं जगू लागल्यात
तुमच्या विचारांचा व्यासंग
समाजाला जडू लागलाय
तुमच्या विचारांतला समाज
खर्या अर्थानं घडू लागलाय
आता समाजही जाणतोय
स्री अबला नाही सबला आहे
स्री शक्तीचा अनुभव सुध्दा
कित्तेकांनी भोगला आहे
समाजालाही कळू लागलंय
कि आपली कोणती हमी
आहे
प्रगत होणार्या या समाजाला
तुमच्या क्रांतीची पार्श्वभुमी
आहे
हे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा
हे तुमचेच वैचारिक स्पंदन
प्रशासकीय कृपा,...?
मोबाईल वापरण्याची हौस
प्रत्येकाच्या मनी दिसु शकते
मात्र कुठे मोबाईल वापरणे
हि अराजकता असु शकते
हल्ली तर जेलमधील कैद्यांचाही
मोबाईल वापराचा सोहळा आहे
कैद्यांच्या या मोबाईल वापरावर
प्रशासनाचाही काना डोळा आहे,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
तंबाखु,...!
कुणी विरोधात आहेत तर
कुणी-कुणी हितचिंतक आहेत
तंबाखु टिकवण्याच्या बाता
आता भलत्याच भंपक आहेत
तंबाखुच्या योग्य-अयोग्यतेवरती
अकलेचे कांदे ना फूत्करले जावे
ज्यांनाही तंबाखुने बरबाद केले
त्यांनाच वास्तव विचारले जावे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
धुसफूसीची कुजबुज
कितीही नाही म्हटले तरीही
मनी मतभेद स्पर्शले जातात
कुणाची धुसफूस होताच
लक्ष सर्वांचे आकर्षले जातात
प्रत्येक धुसफूसीची कुजबुज
जणू सांकेतिक बरबादी असते
तर कुणाची अंतर्गत धुसफूस
बाह्यजनांची लक्षवेधी असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
विज्ञानाचा विचार,...
आधुनिकतेला स्विकारत
कुणी इथे विज्ञानी आहेत
तर विज्ञानाच्या युगातही
कुणी भलतेच अज्ञानी आहेत
विज्ञाना शिवाय जरी इथे
आधुनिक क्रांती घडत नही
तरी मात्र कुणा-कुणाला
सत्य पचनी पडत नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मराठी माणसांची शान,...
महाराष्ट्राची शान मराठी
महाराष्ट्राची जान मराठी
मराठी माणसांची अस्मिता
महाराष्ट्राची त्राण मराठी
जगभरात माय मराठीचा
गौरवणारा झेंडा आहे
मराठी माणसांची शान
मराठीचा अजेंडा आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
माणूसकीचे मारेकरी
माणसांकडून निष्ठूरतेच्या
हद्दी ओलांडल्या गेल्यात
गतानुगतिकतेच्या भावना
माणसांतुन कोलांडल्या गेल्यात
इथे माणूसकीचे मारेकरी
मना-मनात जागत आहेत
माणसांशी वागताना माणसं
माणसांप्रमाणे ना वागत आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३