सहकारी सोसायटी मधील भाडेकरूंसाठी पार्कींगचे नियम
Submitted by मेधावि on 20 September, 2014 - 10:32
आम्ही ज्या सहकारी सो. मधे रहातो तिथे पार्कींगसाठीची जागा अपुरी आहे. काही घरमालकांचे स्वतःच्या मालकीचे पार्कींग आहे. पण पार्कींगमधे स्वतःची गाडी व स्वतःच्या गाडीच्या बाहेर काढायच्या वाटेतच सोसायटीच्या रस्त्यावर स्वतःची दुसरी गाडी त्यांनी लावल्यामुळे बरीच सार्वजनिक जागा आधिच बुक झालेली आहे. रहाता रहिलेली थोडीफार जागा ही गाड्या व माणसांना ये-जा करावयास लागते. ज्या मालकांचे स्वतःचे फ्लॅट आहेत पण पार्कींग मालकीचे नाही त्यांनी पण मोकळ्या जागांवर रुमाल टाकले आहेत. व वहिवाटीचा हक्क असल्यप्रमाणे, बाकी कोणास तिथे गाड्या लावू देत नाहीत.
विषय:
शब्दखुणा: