मायबोलीवरून केलेल्या खरेदीसंबंधी : फॉलो अप, चौकशी, इ.
Submitted by गजानन on 2 July, 2014 - 03:13
नमस्कार,
मी २१-जूनला मायबोली खरेदी विभागातून पाच पुस्तके मागवली होती. २६-जूनला मला त्याचे शिपींग झाले आहे, अशी मेल आली होती आणि नंतर २-३ दिवसांत पुस्तके मिळाली. पण पाचपैकी चारच पुस्तके मिळाली. पुस्तके घरी आली तेंव्हा वडील घरी होते, त्यांनी माझे पार्सल आहे हे बघून घेतले आणि ठेवून दिले. (किती पुस्तके मागवली होती (की आणखी काय मागवले आहे कुणास ठाऊक!!!) याची कल्पना नसल्याने त्यांनी ते पार्सल उघडून पाहिले नाही).
विषय:
शब्दखुणा: