लाभले आम्हास भाग्य.... - मराठी भाषा दिवस २०१४ - मुग्धानंद
Submitted by संयोजक on 25 February, 2014 - 04:38
मुलाखत – स्वाती कपूर –खारकर२ वर्षांपूर्वी नवीन नोकरीवर रुजू झाले ते धाकाधुकीतच, कसे असतील लोक? माझे सहकारी? लीगल डिपार्टमेंट म्हणजे सगळेच वकील..... कसे जमवून घेईण मी त्यांच्याशी? अशातच माझी ओळख झाली अतिशय गोड अशा , विभागात सगळ्यात लहान असलेल्या स्वातीशी. अतिशय चुणचुणीत अशा या पंजाबी मुलीने मला एकदम आपलेसे केले.
मराठी भाषा दिनाच्या स्पर्धांची घोषणा वाचली, आणि ठरविले की स्वातीचीच मुलाखत घ्यायची. तिला हा विचार सांगितल्यावर तर हसायलाच लागली. पण तरी प्रश्न काढलेच.