विषय क्र. १: वाट इथे स्वप्नांची संपली जणू..... क्रिकेट विश्वविजय: १९८३
Submitted by लाल टोपी on 20 August, 2013 - 04:41
२५ जून १९८३ ची संध्याकाळ. भारत विश्वकरंडकाच्या अंतीम सामन्यापर्यंत पोहोचला होता. ६० षटकांच्या त्या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करीत १८३ धावा धावफलकावर लावल्या होत्या. डेस्मंड हेन्स, गॉर्डन ग्रीनिच, क्लाईव्ह लॉईड, सर व्हिव रिचर्डस, गस लोगी, जेफ्री दुजॉ यांच्यासारख्या दिग्गज फलंजांसमोर धावांची ही छोटीशी टेकडी ६० षटकांपर्यंत लढवणे अशक्यप्राय होते. इथपर्यंत पोहोचणे हीच जमेची बाजू मानून विजेतेपदाच्या दुधाची तहान उप विजेतेपदाच्या ताकावर भागवायला भारतीय समर्थक मनाची तयारी करू लागले होते. त्यावेळी वेस्ट इंडिज अजिंक्य मानला गेलेला संघ होता.
विषय:
शब्दखुणा: