एका नामांकीत बिल्डरच्या नवीन बंगलो स्कीम साठी हटके नाव हवं होतं...!
नाव मराठी, इंग्रजी, लॅटीन, स्पॅनिश, फ्रेंच कुठल्याही भाषांमध्ये चालेल फक्त
- फार मोठं नकोय, (शक्यतो एकच शब्द)
- उच्चारायला, लक्षात ठेवायला सोप्पं, कॅची हवं आणि
- समर, अॅक्वा, सी(समुद्र), हवाई थीम अंतर्गत हवं (आणखी आयडियाज सुचवू शकता)
धन्यवाद !!!
एका फ्रोझन फुडच्या ब्रँड साठी योग्य नाव सापडत नाहीये.
कुणी चांगले नाव सुचवू शकेल का?
या ब्रँडच्या अंतर्गत आम्ही फ्रोझन स्वीटकॉर्न, फ्रोझन भेंडी, फ्रोझन फ्लॉवर, फ्रोझन मटार इ.इ. फ्रोझन पदार्थ विकणार आहोत.
याच व्यवसायातील एकाने "फ्रोडेल (Frodel = Frozen + Delicious)" असे नाव घेतले आहे आणि ते हटके असल्याने त्यांना पटकन मिळालेही. कोणाला अशी काही काँबिनेशन सुचत असतील तरीही चालतील.
मागे चहाचे नाव सुचवायला इथल्या लोकांनी खुप मदत केली होती म्हणुन पुन्हा मदत मागायचे धाडस करते आहे.
धन्यवाद !!!