समर जॉब
माझ्या मुलाने मिडलस्कूल पूर्ण केली तेव्हा केलेले हे लेखन. माझा मुलगा 'मोठा' होत होता त्या काळातील आठवणींची पाने. फक्त नावे बदलली आहेत. दुसर्या संस्थळावर हे लेखन काही वर्षांपूर्वी प्रकाशित केले होते. बर्याच जणांनी लिंक मागितली होती म्हणून मायबोलीवर पुन्हा प्रकाशित करत आहे.
गेल्या आठवड्यात माझ्या मुलाचा समर जॉबचा पहिला दिवस होता. इथे १४ वर्ष पूर्ण झाली की मुलं part-time job करू शकतात. बरीच मुलं १०-११ वर्षापासून छोटी-मोठी कामं करून कमाई करु लागतात. मुलाला पहील्या दिवशी कामावर सोडुन येताना मला त्याने कमाईसाठी केलेल्या उचापती आठवत होत्या.