अमेरीकेतला खरा न्याय !!

Submitted by इल्बिस on 23 January, 2013 - 07:41

ही बातमी आहे, विनोदी लेख नाही.

विनोदी लेख म्हणुन घेतला तरीही तुमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल, पण त्याला माझा नाईलाज आहे.

म टा मधली बातमी वाचुन हुSSSश्श झाले,....

आज हेडलीला शिक्षेसाठी शिफारस केली गेली,

हेडलीला तपास कार्यात केलेल्या सहकार्याची बक्षिसी म्हणून आजन्म कारावासाऐवजी ३० ते ३५ वर्षांच्या कारवासाची शिक्षा ठोठावण्याची शिफारस अमेरिकन सरकारने न्यायालयात केली आहे.
हेडलीने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. मात्र त्याचवेळी त्याने तपासकार्यात केलेले सहकार्यही तेवढेच महत्वाचे आहे. हेडलीकडून दहशतवादी कारवायांबाबत मिळालेल्या महत्वपूर्ण माहितीमुळे दहशतवादाविरूद्धच्या लढ्याला बळकटीच मिळाली आहे, असे शप्रियो म्हणाले.

मुंबईवरील २६ / ११ च्या अतिरेकी हल्याचा पडद्यामागचा सूत्रधार लश्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेविड कोलमन हेडली याला भारताच्या हवाली करण्यास अमेरिकेने पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

हेडलीनेच मुंबईवरील दहशतवादी हल्याचा कट रचला होता. या हल्यात १६४ निष्प्पापांना प्राण गमवावे लागले तर शेकडो लोक जखमी झाले. नोव्हेंबर २००८ मध्ये हा हल्ला करण्यात आल्यानंतरही हेडलीच्या कारवाया थांबल्या नाहीत. या ह्ल्ल्याला दोन महिने झाले नव्हते तोच हेडलीने डेन्मार्कमध्ये हल्ल्याचा कट रचायला सुरूवात केली होती. तो तेथे रेकीही करुन आला. अमेरिकेत जन्मलेला हेडली केवळ लश्कर-ए-तोयबाच नाही तर अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी अनेक वर्षांपासून काम करत होता. तरीही त्याच्या अटकेने एक फार मोठे दहशतवादाचे जाळे समोर येऊ शकले आहे. लश्कर-ए-तोयबासाठी काम करणा-या प्रमुख व्यक्ती, या दहशतवादी संघटनेची रचना, काम करण्याची पद्धत, भविष्यातले कट आणि क्षमता याबाबत कधीही समोर न आलेली माहिती हेडलीमुळे मिळाली. त्याने दिलेल्या माहितीमुळे अन्य सात आरोपींविरूद्ध आरोप ठेवण्यासही मदत झाली. त्यामुळे हेडलीचे सहकार्य लक्षात घेऊन त्याचा गुन्हा आजन्म कारावास देण्यायोग्य असला तरी तसे न करता त्याला जास्तीत जास्त ३५ वर्षे कारावासची शिक्षा ठोठावण्यात यावी, असे शप्रियो यांनी स्पष्ट केले.

हेडलीने भारतीय अधिका-यांच्या चौकशीलाही चांगले सहकार्य केले. सात दिवस या अधिका-यांनी त्याची कसून चौकशी केली. असे सहकार्य त्याच्याकडून भविष्यातही अपेक्षित आहे. तसेच हेडलीमुळे भारतालाही दहशतवादाशी लढा देण्यात मदत झाली, असे अमेरिकन सरकारने आपल्या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेची आडेबाजी ?

हेडली आणि तहव्वूर राणाबाबत अमेरिकन सरकारने दोन मापदंड लावल्याचे स्पष्ट दिसत आहे. राणावर कोपनहेगनमधील एका डेन्मार्कच्या वर्तमानपत्रावर हल्ल्याचा कट रचल्याचा मुख्य आरोप होता. त्याला हेडलीपेक्षा जास्त वर्षांच्या शिक्षेची शिफारस करण्यात आली होती. त्याला प्रत्यक्षात १४ वर्षांचीच शिक्षा ठोठावण्यात आली ही बाब वेगळी.

ह्याला म्हणतात न्याय, नाहीतर भारतीय उगाच कोणालाही फाशी द्या म्हणुन मागेच लागतात.

मी तर असे सुचवीत आहे की भारतीयांनी सुद्दा हेडलीचे भुत मानेवरून ऊतरायला हवे,

त्यानेच तर भारतीय अधिकार्यांना अमेरीका दौर्याची संधी उपलब्ध करुन दिली, आणि चौकशीच्या वेळी
चांगलेच सहकार्य देखील केले, पुढे देखिल तो असे करेल असे त्या अधिकार्यांचे म्हणणे आहे.

हेडलीचे व तहव्वुर राणाचे ३०-३५ वर्षांनंतर अमेरीकेत काय होईल हे मलाच काय कोणालाच सांगता येणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाँग लिव्ह सॅम अंकल !!

ह्याला म्हणतात राजकारण !
प्रथम हॅडलीचा वापर केला एजंट म्हणून मग तो फिरला आणि अतिरेकी झाला, त्यावर त्याला केला माफीचा साक्षीदार, काय करणार कुठे तोडं ऊघडल तर अमेरीकेचीच गोची,

ह्या अमेरीकन पासपोर्ट् मूळेच हॅडली भारतात सहज येत जात राहीला.

जर डेव्हीड हेडलीला हा न्याय तर मग हाफिज सईद ला तर मोकळेच सोडतील हे लोक.

जाऊ दे आपल काय जातय.

३०-३५ वर्षांनंतर येउन काही अतिरेकी कारवाया केल्या तर त्या वेळी बघुन घेऊ,

उगाच डो क्याला आता ताप नको.

ह्यात काही तरी गडबड आहे .

ह्यागोष्टीच्या इतका सहज सोप्पा अर्थ काढु नये असे वाटते ...ती अमेरिका आहे , इन्डिया नाही .

हेडली कडे नक्कीच अजुन काही तरी धागे दोरे असनार , कदाचित लादेनजी किंव्वा हाफीजसाहेबां विषयी ....

सी आय ए सारखी प्रोफेशनल किलर असो. चालवणारी अम्रेरिका , इतकी सरळ सोप्पी औदार्यवान असेल असे मुळीच वातत नाही

भारतीय अधिकार्यांना अमेरीका दौर्‍याची संधी मिळाली हेच ह्या सगळ्यातले फलित आहे. चांगले अमेरिका दर्शन झाले त्यांचे.

Lol

gr8

हफीज सईद म्हणजे, ते लाल जाकीट वाले एक देशभक्त पत्रकार त्याला पाकिस्तानात जाऊन भेटून आले आणि गुप्त वार्ता केल्या, तोच का तो ?