लॉकडाऊन , निसर्ग आणि मी

Submitted by डी मृणालिनी on 14 April, 2020 - 11:42

मनुष्य प्राणी सोडून सगळे प्राणी मुक्तसंचाराचा आनंद घेत आहेत. मनुष्य मात्र लोकडाऊनमुळे आपल्याच घरात जणू कैद झाला आहे. संपूर्ण भारतात लोकडाऊन आहे. पण तो सर्वाधिक जाणवतो तो सर्वसुखसुविधांनी युक्त अशा महानगरांमध्ये ! गावातल्या अर्थचक्रावर जरी फरक पडला असला तरी दैनंदिन जीवन मात्र नेहमीप्रमाणेच पशु -पक्षी झाडे -वेली यांच्या सान्निध्यात रमलेलं आहे. त्यातलीच मी एक . संपूर्ण जगाचं लक्ष आज कोरोनाकडे असताना मी मात्र आकर्षित होते बदलत्या निसर्गाकडे. कोरोनासारख्या एका गंभीर आपत्तीने आपल्या तथाकथित विकासाला आळा घातला . हे मान्य. पण मग व्हेनिसच्या कालव्यात डॉल्फिन आणि स्वान कुठून आले ?

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - व