फसू नका तुम्ही फसू नका
Submitted by पाषाणभेद on 16 September, 2010 - 05:05
फसू नका तुम्ही फसू नका
विज्ञानाची कास धरा तुम्ही
ज्योतिषांच्या नादी लागू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||धृ||
लांब दाढी कपाळी टिळा
बोटात अंगठ्या गळ्यात माळा
समोर पोपट चिठ्ठी काढतो
त्यावरचे भविष्य ज्योतिषी वाचतो
गद्य: जो दुसर्यांचे भविष्य वाचतो त्याला त्याचे भविष्यतरी ठावूक असते काय?
अशा ज्योतिषासमोर बसू नका, बसू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||१||
देई गंडा ताईत दोरा
अंगार्या धुपार्यांचा करी उतारा
राशी ग्रह नक्षत्र कामाला लावी
पोट भरण्या तुम्हाला फसवी
गद्य: अशा भोंदूला त्याच्या जीवनात समस्या नसतात का?
अशा भोंदूकडे तुम्ही जावू नका, जावू नका
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा