मेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी |
हे दिल जसं हिंदुस्थानी आहे तशी आपल्या जीभेची चवही अस्सल हिंदुस्थानी नाही का ? पिझ्झा हट मधल्या तंदूरी पिझ्झ्यावर उगीच का उड्या पडतात?
ह्या अस्सल हिंदुस्थानी जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्हीही कधी घरातल्या घरात फ्युजन पाककृती निर्माण केल्या असतील. आपल्या मराठी पदार्थांखेरीज कध्धी काहीही न खाणार्या सासुबाईंकडून पसंतीची पावती मिळवली असेल.
पण फक्त चाटून पुसून स्वच्छ झालेल्या ताटाकडे बघून समाधान मानू नका तर आपल्या पाककृती मायबोलीच्या गणेशोत्सव पाककृती स्पर्धेत सादर करुन सर्वांचीच दाद मिळवा!!
"नाव विदेशी-चव देशी" - पाककला स्पर्धा
********************************************************
स्पर्धेचे नियम :
१. पाककृतीत वापरल्या जाणार्या साहित्यामधे महत्वाचा घटक हा विदेशी आणि बाकी भारतीय घटक असावेत. मुख्यतः भारतीय मसाले किंवा भारतीय भाज्या, डाळी, फळं (घटक) वापरून मूळ पाककृतीत केलेला बदल लिहिणे अपेक्षित आहे.
२. पाककृती मुद्देसूद व व्यवस्थित लिहीलेली असावी.
३. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पाककृती चालतील.
४. पाककृती सोबत छायाचित्र देणे बंधनकारक नाही पण असल्यास उत्तम. परिक्षकांनी दिलेल्या गुणांची बरोबरी झाल्यास छायाचित्र असलेल्या प्रवेशिकेला प्राधान्य देण्यात येइल.
५. पाककृती साधारणपणे २ ते ६ लोकांच्या वाढणीची असावी.
६. पाककृतीसाठी लागणारे जिन्नस भारतात आणि भारताबाहेर सहज उपलब्ध असावेत.
७. या स्पर्धेसाठी वेळमर्यादा नाही. पण तरीही ती वेळखाऊ नसावी. तयारीचा वेळ व पाककृती बनवताना लागणारा वेळ ह्या दोन्ही गोष्टी नमूद केलेल्या असाव्यात.
८. पाककृतीसाठी मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन वापरले तरी हरकत नाही. या उपकरणांना काही पर्याय असेल तर तो पाककृती मध्ये नमूद केलेला असावा.
९. पाककृती पारंपारिक (उदा. इटालियन पिझ्झा) असली तरी त्यात केलेले बदल, स्वतः केलेले असावेत. ते तसे पाककृतीत नमूद करावेत.
१०. प्रादेशिक अथवा स्थानिक घटक पदार्थांसाठी पर्यायी घटक पदार्थ देणे स्वागतार्ह आहे परंतु बंधनकारक नाही.
११. फुड नेटवर्क वरुन किंवा संजीव कपूर किंवा इतर कोणाची पाककृती जशीच्या तशी उचलून स्पर्धेत टाकलेली नसावी. पाककृतीच्या माहितीचा स्त्रोत लिहिणे बंधनकारक आहे.
१२. पाककृती ह्याआधी मायबोलीवर प्रसिद्ध झालेली नसावी. स्पर्धेच्या विषयाला धरुन मायबोलीवर प्रसिद्ध झालेल्या एखाद्या कृतीत बदल केले असल्यास चालेल.
१३. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
प्रवेशिका पाठवण्यासाठी आपल्याला या ग्रूपचे सभासद व्हावे लागेल आणि 'नविन पाककृती' वर टिचकी मारून आपली पाककृती लिहावी लागेल.
********************************************************
आलेल्या प्रवेशिका
लझाना http://www.maayboli.com/node/10295
मराठी पिझ्झा http://www.maayboli.com/node/10471
वरणातला पास्ता http://www.maayboli.com/node/10484
स्पॅगटी इन रेड सॉस - http://www.maayboli.com/node/10509
ओरिगामी सुशी विथ मिंट डिपींग सॉस - http://www.maayboli.com/node/10559
लेंटील पाय - http://www.maayboli.com/node/10581
नमस्कार संयोजक, प्रवेशिका
नमस्कार संयोजक,
प्रवेशिका पाठवण्याची शेवटची तारिख काय? प्लिज सांगाल का?
प्रवेशिका अनंत चतुर्दशी (३
प्रवेशिका अनंत चतुर्दशी (३ सप्टेंबर) पर्यंत पाठवता येतील.
लग्गेच उत्तर.. धन्यवाद
लग्गेच उत्तर..
धन्यवाद संयोजक...
प्रवेशिका दिसत नाहियेत. हे
प्रवेशिका दिसत नाहियेत. हे नाविन्यपूर्ण पदार्थ आम्हाला कधी वाचायला मिळणार...निकाल लागल्यावर का?
नमस्कार मिती तुम्ही मायबोली
नमस्कार मिती
तुम्ही मायबोली गणेशोत्सव २००९ या ग्रूपमध्ये सदस्यत्व घेवुन "सामील" झालात की आपोआप दिसतील सगळ्या प्रवेशिका.
नमस्कार संयोजक, माझी
नमस्कार संयोजक,
माझी प्रवेशिका, इथे - http://www.maayboli.com/node/10509 आहे.
नमस्कार संयोजक, पाककृतीमधे
नमस्कार संयोजक,
पाककृतीमधे इमेज कश्या टाकायच्या? खालती टॅग दिसत नाहियेत
प्लिज लग्गेच उत्तर द्या.....
पाककृतीमधे इमेज टाकता येत
पाककृतीमधे इमेज टाकता येत नाही.. त्यासाठी लेखनाच्या धाग्यामधे पाककृती लिहावी लागेल.
येते टाकता. कुठेही जशी टाकू
येते टाकता. कुठेही जशी टाकू ती लिन्क पेस्ट करायची पाककृतीत.
लालु नक्की सांग ना कसं ते?
लालु नक्की सांग ना कसं ते? प्लिज...
तू इतर ठिकाणी फोटो टाकताना या
तू इतर ठिकाणी फोटो टाकताना या चौकटीत जी लिन्क येते ना, ती कॉपी कर. म्हणजे पाककृतीचा फोटो दुसरीकडे कुठेतरी 'इमेज' लिन्क दिसते तिथे टाकायला जा, आणि ती लिन्क आली की ती पाककृतीत पेस्ट कर.
मी इथे टाकली आहे बघ तशी.
http://www.maayboli.com/node/6291
ओ के... म्हणजे तिकडुन उचलुन
ओ के... म्हणजे तिकडुन उचलुन इकडे डकवायची... डायरेक्ट इथे डकवता येत नाही तर....
बघते प्रयत्न करुन...
लग्गेच उत्तर दिलस.. धन्स लालु...
आणि भाग्यश्री तुला पण ठांकु गं...
ओह.. मला माहित नव्हते हे मी
ओह.. मला माहित नव्हते हे मी पण पाकृमध्ये फोटो टाकता येत नाही म्हणून लेखनाच्या धाग्यामध्ये लिहीले.
नमस्कार संयोजक, माझी पाककृती
नमस्कार संयोजक,
माझी पाककृती प्रवेशिका इथे आहे...
http://www.maayboli.com/node/10559
धन्यवाद.