करावया प्रश्न्नाची उकल
त्यासाठी जे अटळ
उतरुनी करु रस्त्यावर || सत्वरी .
प्रश्ण जर सुटता घरी बैसोनी
काय त्याचा उपेग आम्हा कारणी
कैसी मग प्रतिष्टा मिळे || पुढार्यासी .
लाऊ ब्यानर प्रत्येक चौकी
द्रुष्टीस पडो सर्वासी
न दिसो ट्रेफिक कोणासी || अपघाती जे .
उदंड जाहले पोस्टर
सोम्या गोम्या आणि नरवर
शुभेच्छुक असता ह्जारोवर || प्रत्येकी .
खर्च म्हणता पुसू नका
उत्तरादाखले ह्सू नका
लायकी आपली सिध्द करा || निर्लज्जपणे .
पळवा रे झडकरी राजदंड
जसा असावा इ़क्षुदंड ( ऊस )
चावून चोथा करा राजधर्म || झडकरी.
बरी करावी गुंडगिरी
वाढी लागो पुंडगिरी
येकदा येता निवडोनी || नगरसेवकी.
लायकी कधी बघो नये
जात आपली सांडो नये
शिक्षण कधी पुसो नये || नोकरीसाठी .
ऍसी असो द्यावी अपुली करणी
जयामध्ये आहे आपलीच भरणी
सर्वत्र लावावी वर्णी || आश्रीतांची .
स्थायी अथवा शिक्षण समिती
आरोग्य अथवा मदत समिती
असावी आपली एक नीति || भ्रष्टाचारी .
निष्ठा नसावी पक्षाशी
असावी कोण्या भाईशी
निगडीत आहे अर्थाशी || जोवरी .
निविदा काढता प्रशासन
आपण राखावे अवधान
करावे पहिले समाधान || बिल्डराशी .
वाढवून ध्यावा शेकडा
तसेच मागावा रोकडा
हा मंत्र आहे फाकडा || श्रेयाशी.
व्रत घेता नगर सेवेचे
आपण उतावे कायमचे
जमेल तितुके माजावे || भूवरी.
राखावी ही दूरद्रुष्टी
सात पिढ्यांची करावी पुष्टी
किर्ती दिगंत पसरावी || या कारणे.
अर्थासाठी करावे पक्षांतर
लक्ष न द्यावे निष्टेवर
अन्याय झाला अपल्यावर || सतत वदावे.
रस्ते झाडे आणि बागा
यासी न द्यावी कुठे जागा
करो द्यावा लोका त्रागा || लक्ष न द्यावे.
रस्ती असो द्यावे खड्डे
कुत्री जनावरांचे अड्डे
कमीशनी मात्र मोजावे गड्डे || नोटांचे .
सदा करोनी अर्थ घोटाळे
बुडवावे कर्ज जंजाळे
आप्तस्वकीयांसी नागवावे || सर्वकाळी .
स्वार्थ आपुला साधावा
बळेची संबंध जोडावा
असे जोवरी गोडवा || नित्य गावा.
मागुती खडे फोडावे
विश्वासघाता जवळी करावे
भ्रष्टाचारा सदा भजावे || आपुलेपणाने.
गल्लो गल्ली पेरावे पंटर
गौरवावे म्हणोनी बहाद्दर
करिती आपल्यासाठी राडा
सत्वर त्यासी सोडवावे || सांगणे न लगे.
एक हाती ज्याच्या सेल
दुजा हाती धरला धूम्रधर
रेबॅन आयनी लाविला
म्या तया नमस्कारिला || तिन्ही काळी.
सर्वदा मुखी शोभे " भ कार "
वाढो कीर्त निरंतर
तया माझा नमस्कार
संपुटी साठवू तव रूप || सदा पै जे .
----- अरूण लेले ,