Submitted by माणूस on 23 July, 2009 - 14:37
सध्या बाजारात विविध प्रकारचे खाद्य तेल मिळते.
कोणते तेल, कोणती गोष्ट बनवताना वापरावे हे ईथे मांडता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@सामो - घी ऑइल म्हणजे काय
@सामो - घी ऑइल म्हणजे काय प्रकार असतो ? सहसा तुपाला क्लेरिफाईड बटर म्हणतात पाश्चात्य देशांत असे ऐकून होतो, घी ऑइल अजून काही वेगळं असतं का ?
जेम्स वांड ओके.
जेम्स वांड ओके.
तरी असला पदार्थ घरी बनवणे हे ही भारीच आहे
अवांतराबद्दल क्षमस्व
जेम्स बाँड
जेम्स बाँड
मी फक्त मोहरीचे तेल ह्या विषयी च सांशक आहे...
मोहरी ज्या वर्गातील आहे त्या वर्गातील त्या वर्गातील बाकी वनस्पती आणि त्यांच्या बिया मधून तेल निघत असलेलं तेल त्या विषयी माझे काहीच मत नाही.
मोहरी आख्खी जिथे जिथे वापरली जाते ते सर्व पदार्थ आवडीचे आहेत.
फक्त मोहरीचे तेल.
एकच family मधील सर्व सदस्य नावडते नाहीत.
फुल गोबी , broccoli एकच फॅमिली आहे पण त्यांच्यात फरक आहे ना.
आणि पूर्वग्रह पण नाही मोहरी तेला विषयी.
पण त्याचा वास खूप वेगळा असतो .
आणि चव पण.
जी चव आणि वास बाकी तेलात नसतो.
ऑलिव्ह, तीळ,सोयाबीन,भुईमूग,खोबरे,राइस.करडई .
आणि मोहरी पण .
ह्या सर्व तेलातील पदार्थ नी खाल्ले आहेत.
मोहरी व्यतिरिक्त बाकी कोणतीच तेल वेगळी वाटली नाहीत जास्त प्रमाणात.
रामदेव बाबा काऊ घीवर मेड इन
रामदेव बाबा काऊ घीवर मेड इन इंग्लड छापले आहे
तिकडल्या गाई आयुर्वेदिक आहेत ?
https://www.ubuy.co.in/product/ED02DD2-patanjali-cow-ghee-1kg?utm_source...
ब्लॅक कॅट
ब्लॅक कॅट
पळपुटा रामदेव मध्येच कोठून काढला.
अण्णा हजारे उपोषण आणि लाठी चार्ज झाला की लुगडे नेसून पळणारा रामदेव.
मी त्याची फक्त टूथपेस्ट
मी त्याची फक्त टूथपेस्ट वापरतो
आणि एकदा ओट्स आणले होते
बाजारू तूप खरोखरच तूप असते का ? इतक्या गाई भारतात आहेत का ?
देशी गाई चे तूप ही पूर्ण थाप
देशी गाई चे तूप ही पूर्ण थाप आहे.
कॅप्टन च थापडा आहे बाकी लोकांना काय बोलणार.
माझ्या पूर्ण गावात ज्या गावाची लोकसंख्या पंधरा हजार नक्की आहे ,जास्त च समजा..
५० पण देशी गाई नाहीत.
रामदेव थापा मारत आहे.
गाय किती पवित्र असली तरी चार
गाय किती पवित्र असली तरी चार लिटर च दूध देते..
ट्रॅक्टर मुळे देशी बैल पण कोणाला नको असतात.
पंचवीस तीस लिटर दूध ( कोणतेच चांगले अन्न घटक नसणारे फक्त पांढरा रंग असलेला द्रव )देणारी संकरित गाई च सर्व पाळतात.
खिल्लार किंवा बाकी देशी गाई च्या जाती बहुसंख्य हिंदू असणाऱ्या देशात.आणि गाई लं पवित्र समजणाऱ्या देशात पण ..
नाहीश्या होण्याच्या मार्गावर आहेत.
सत्य हे सत्य च असते.
फक्त ते पचत नाही.
मोहरी तेल आणि हेल्थ बेनिफिट.
मोहरी तेल आणि हेल्थ बेनिफिट.
असा कोणी युक्तिवाद केला तर ते औषध म्हणून वापरा..
पण त्या तेलाचा वास आणि चव खूप भयंकर असते.
भारतामधील काहीच राज्यातील लोक आणि आशिया मधील मोजकेच देश आणि त्या देशात मोजकेच भाग ..तो वास आणि चव सहन करू शकतात.
बाकी जग नाही.
Sunflower, शेंगदाणा तेल नेहमी
Sunflower, शेंगदाणा तेल नेहमी असते. राईस ब्रान पण वापरले.पण पुऱ्या वगैरे तळणीला ते तेल चांगले नाही असं मला वाटले.दोन पिशव्या सोयाबीन तेल वापरले.काही वेगळे वाटले नाही.शेंगदाणा तेलाने असिडिटी होतेय असे वाटले.कदाचित काकतालीय न्याय असेल.
पंजाबी शेजारीण सरसोका साग देते तो मोहरीच्या तेलात बनवलेला असतो.ज्याची चव त्याच तेलात मस्त लागते. खरं तर तो साग आणि मकेकी रोटी चापतना तेलाबिलाचा काही वास येत नाही,इतके ते भन्नाट लागते.
खोबरेलाचं काय करायचं?
खोबरेलाचं काय करायचं/ करावं?
खोबरेल तेल काही भाज्यांमध्ये,
खोबरेल तेल काही भाज्यांमध्ये, आमट्यांमध्ये,मासे तळताना मस्त लागते.वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे उडदाच्या भाजलेल्या पापडावर 1-२ थेंब कच्चे खोबरेल तेल घालून छन लागते.
पापडाची, सुंगटाची (करंदी)कोशिंबीर केल्यावर वरून कच्चे खोबरेल तेल मस्त लागते.
ब्लॅककॅट मी वापरलं आहे ते मेड
ब्लॅककॅट मी वापरलं आहे ते मेड इन ब्रिटन तूप, २ लिटर चं टीन मधलं, तेव्हाही हाच प्रश्न पडला होता. पिवळं कणीदार असतं. अजूनही वापरत आहे.
झ्या पूर्ण गावात ज्या गावाची
झ्या पूर्ण गावात ज्या गावाची लोकसंख्या पंधरा हजार नक्की आहे ,जास्त च समजा..
५० पण देशी गाई नाहीत.
रामदेव थापा मारत आहे>>>>
ज्यांना तुपाचा धंदा करायचा आहे ते गावावर अवलंबुन राहणार की स्वतः गाई पाळणार? असो.
मोहरीचे घाण्यावर काढलेले तेल मिळणे कठिण असावे. काढताना खुप उष्णता निर्माण होते, मोहरीचा वासही तिक्ष्ण असतो, तेल काढताना श्वासाचा खुप त्रास होतो ही माहिती युसुफ. मेहरअली सेन्टरवर मिळाली. त्यांनी मोहरी तेल ठेवायचे बन्द केले. बाजारात बहुतेक सर्वत्र भेसळयुक्त मोहरीचे तेल मिळते ही माहितीही तिथेच मिळाली होती.
आमच्या आजोबांचा होता तुपाचा
आमच्या आजोबांचा होता तुपाचा व्यवसाय, एकही गाय नव्हती घरी
छान!
छान!
---ज्यांना तुपाचा धंदा करायचा
---ज्यांना तुपाचा धंदा करायचा आहे ते गावावर अवलंबुन राहणार की स्वतः गाई पाळणार? असो.----
जाणे कहा गये वो दिन
आता असा धंदा करत नाही कोणी.
तुपाचा धंदा करायचा तर गावं, फार्म ठेक्यावर घ्या, काम तुम्हीच करा माल आमालाच द्या वर्षांचा रेट ठरवून.
अन् रामदेव बाबाच्या तुपाच्या बाटली वर लिहिलं असतं गाय का शुद्ध देसी घी. देसी गाय का शुद्ध घी नाही. बनेल व्यापारी आहे तो. देसी घी म्हणजे बाकी काय इम्पोर्टेड घी विकतात का?
अन् क्रॉनी कॅपीटालीजमचा माननीय सदस्य आहे बाबा.
देशी काय 5 ltr पेक्षा जास्त
देशी काय 5 ltr पेक्षा जास्त दूध देणे शक्य नाही ते दोन वर्षात 7 एक महिनेच.
त्या दोन वर्षात तिची गर्भ अवस्था पण आहे
ह्या इतक्या कमी दुधात देशाला देशी गयी चे तूप उपलब्ध करून देण्यासाठी देशाच्या लोकसंख्या पेक्षा जास्त गायी लागतील.
रामदेव बाबांनी कुठे ठेवल्या आहेत इतक्या गायी..चंद्रावर की मंगळवार.
देशी घी आणि देशी गायी च्या
देशी घी आणि देशी गायी च्या दुधापासून बनलेले घी दोन्ही अर्थ वेगळे आहेत.
फसवणुकीचा गुन्हा दाखल होवू नये म्हणून.
गाय का देशी शुध्द घी .
असे रामदेव बाबा लिहतो.
देशी गाय का शुध्द घी असे लिहीत नाही
पण लोकांचा गैर समज करण्यास रामदेव बाबांचे वाक्य यशस्वी होतेच.
आम्ही घाण्याचे तिळाचे तेल
आम्ही घाण्याचे तिळाचे तेल वापरतो.तळायला gold winner sunflower oil best.गोड पदार्थ करायला(तळायला) तूप (घरचे)/शेंगदाणा तेल.चव मस्तच.खूप अनुभव घेऊन प्रयोग करुन वापरत आहोत.
मोहरी,करडई,तीळ,. . .वगैरे
मोहरी,करडई,तीळ,. . .वगैरे घाणीतून काढलेली तेलं मिळतात. पण ती दुप्पट भावाने मिळतात. यास cold press म्हणतात. जी पेंड उरते त्यातही खूप तेल बाकी असते. बाजारू तेलं सॉल्वंट वापरून पेंडीतलंही तेल काढतात. शिवाय ठोक भावाने मोठःया प्रमाणात तेलबिया घेतात. पेंड गोठेवाले नेतात. त्याचेही पैसे मिळतात. म्हशींना पेंडीतल्या तेलाची आवश्यकता नसून त्यातल्या प्रोटिनची गरज असते.
Cold press घाणीचे तीळ तेल २०० एमेल १२०रु ( पातंजली तेच ६५रुला देते. लेबल - first pressed and filtered. Marketed by patanjali. )
Cold press घाणीचे मोहरी तेल २०० एमेल १००रु.
मसाजसाठी घाणीचं तेल आणलं आहे . खाण्यासाठी परवडणारं नाही.
((तेलं लगेच विकली गेली नाहीत तर ती तेलं काढणं घाणीवाले बंद करतील. कारण त्यांच्याकडून कोणी दुकानदार घेणार नाहीत.))
बाजारातील खाद्यतेलात स्वस्त
बाजारातील खाद्यतेलात स्वस्त असण्याचे कारण त्यात पाम ऑईल ब्लेंड केलेले असते. त्यामुळे पाम ऑईलचे भाव वाढले की भुईमूग,सुर्यफुलाच्या तेलाचे भाव वाढवले जातात.
आम्ही घाण्याचे तिळाचे तेल
आम्ही घाण्याचे तिळाचे तेल वापरतो. >> रोजच्या स्वैपाकाला का ? मला पण वापरून पाहायचे आहे. नाशिक किंवा पुण्यात कोणते दुकान/घाणा चांगले माहित असेल तर कृपया नक्की सांगा ..
हो रोजच्या वापरासाठी.आम्ही
हो रोजच्या वापरासाठी.आम्ही तीन जणात काळे तीळ विकत घेतो.त्यातील एकाच्या भावाचे घाणा काढायचे दुकान आहे ते काढून देतात.त्यामुळे तेल बिना भेसळीचे मिळते.थोडे कडवट लागते पण तमीळ स्वयंपाकात तीळाचे तेलच वापरतात.कुठल्या पदार्थात वापरायचे कुठल्या नाही हे एकदा करुन पाहिल्यावर कळेल.
आमच्या आजोबांचा होता तुपाचा
आमच्या आजोबांचा होता तुपाचा व्यवसाय, एकही गाय नव्हती घरी,
सायकलवरून फिरून दूध आणत होते , ते तापवून वगैरे तूप काढत होते.
पण 1948 च्या गोडसे दंगलीत घरातील सगळे तूप दंगलखोरांनी गटारीत ओतून दिले होते , पंधरा दिवस गावच्या गटारीतून नुसते तूप वहात होते.
एक माणूस बाथ टबसारखा आत बसून त्यात आंघोळ करू शकेल इतकी मोठी पितळेची पातेली होती , ती कालांतराने मोडीत घातली
हो रोजच्या वापरासाठी.आम्ही
हो रोजच्या वापरासाठी.आम्ही तीन जणात काळे तीळ विकत घेतो. >> ओह काळे तीळ , मी बरेच दिवस पांढऱ्या तिळाचे वापरायचा प्रयत्न करत होतो ..
पाहतो काळया तिळाचे तेल कुठे मिळते ते , पण कडवट चव असेल तर थोडं कठीण वाटतंय .. आमटी करून पाहतो ..
धन्यवाद @सोना पाटील म !
हो रोजच्या वापरासाठी.आम्ही
हो रोजच्या वापरासाठी.आम्ही तीन जणात काळे तीळ विकत घेतो.त्यातील एकाच्या भावाचे घाणा काढायचे दुकान आहे ते काढून देतात >>
@सोना पाटील - हे दुकान पुणे किंवा नाशिक जवळ आहे का ?
नवीन मशीन पहिले आहेत - तेल
नवीन मशीन पहिले आहेत - तेल एक्सट्रॅक्ट करणारे ते कोणी वापरले आहेत का ? अनुभव सांगू शकाल का ?
नाही ओ शोधक मी तमीळनाडू मधे
नाही ओ शोधक मी तमीळनाडू मधे राहते.पण प्रत्येक गावात घाणा काढायची गिरणी असते.तुम्ही शोधा नक्की सापडेल.आमटी मधे तिळाच्या तेलाने चवीत फारसा फरक पडत नाही पण नाष्टा पदार्थ (पोहे,उपमा,ई..)आणी गोड पदार्थ यामधे चव थोडीशी कडवट लागते बाकी काही नाही.
कडवट लागतं मग मुद्दाम कशाला
कडवट लागतं मग मुद्दाम कशाला खायचं?
Pages