Submitted by रूनी पॉटर on 9 July, 2009 - 16:49
फिलाडेल्फियात भरलेल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनाची सांगता झाली ती वॉशिंग्टन डी. सी.च्या मराठी मंडळाने
सादर केलेल्या मनात नाचते मराठी या कार्यक्रमाने.
सुमारे ८५ स्थानिक कलाकारांनी मिळुन सादर केलेल्या ह्या कार्यक्रमात महाराष्ट्रातले वेगवेगळे सणवार, देवीचा गोंधळ, जागर, गणेशोत्सव, दहीहंडी, कोळीगीत, लावणी, ऐतिहासिक घटना इ. चा सुरेख मेळ घातला होता. थोडक्यात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळखच करुन दिली मनात नाचते मराठीने.
इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना घेवुन कार्यक्रम करणे, सराव करणे, सगळ्यांचे व्यवस्थित सिंक्रोनायझेशन करणे, आणि सादर करतांना कुठेही गोंधळ होवु न देणे याबद्दल या लोकांचे मनापासुन कौतुक करायला हवे.
अजुन एक, यात लालूनेपण भाग घेतला होता बर का.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहीये ! The Great
सहीये !
The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा. आभारी आहे.
ह्या
ह्या कार्यक्रमात महाराष्ट्रातले वेगवेगळे सणवार, देवीचा गोंधळ, जागर, गणेशोत्सव, दहीहंडी, कोळीगीत, लावणी, ऐतिहासिक घटना इ. चा सुरेख मेळ घातला होता. >>> लालू कशात होती?
वरचे फोटो छान आलेत.
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
सही..
सही.. म्हणजे 'मराठी बाणा'सारखा कार्यक्रम होता तर हा.. शाहीर विठ्ठल उमपही असाच कार्यक्रम सादर करतात. पण त्यांच्या कार्यक्रमात एकमेव आकर्षण म्हणजे ते स्वतः. बाकी काही खास नसतो तो कार्यक्रम.
लालूने 'गोंधळ' घातला ना?
लालूने
लालूने 'गोंधळ' घातला ना?>>>
तिथेही तेच का?
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
चिनूक्स, psg,
चिनूक्स, psg, असले काही लिहू नका.
लालू यांनी कोथळा काढणार्या छत्रपति श्री शिवाजीमहाराजांची भूमिका केली होती. त्यांना खरी वाघनखे मिळाली तर तुमची धडगत नाही!!
हा
हा कार्यक्रम छान होता. (वाघनखांच्या भितीने म्हणत नाहीये!)
'मराठी बाणा'च्याच धर्तीचा होता.
नृत्यदिग्दर्शन चांगलं होतं आणि त्याचबरोबर सर्व लहानथोर कलाकारांनी नृत्यात आवश्यक तितका अभिनयपण चांगला केला. कार्यक्रमात एक प्रकारची उर्जा होती. सोहळ्याची दमदार सांगता या कार्यक्रमाने झाली.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
स्वातीला
स्वातीला अनुमोदन... ताकदीने सादर केलेला कार्यक्रम असं मी म्हणणारच होतो पण ती उर्जा म्हणाली.
उत्तम...
लालू पिवळ्या लुगड्यात होती. तिचे फोटो इथे दिसत नाहीत. तिचे फोटो टाक रुनी.. भाई पण काढणार होते फोटो..
विनय
विनय पहिल्
विनय
पहिल्या फोटोत आहे लालू पिवळ्या साडीतली, पण नीट दिसत नाहीये. कोणाकडे अजुन असतील फोटो तर टाका.
हो, डीजेने
हो, डीजेने दिलेली 'बाणा' ची लिन्क पाहून तेच वाटलं.
मी गोंधळ-जागर केला, आणि 'संत, पंत, कवी' मध्येही होते. सध्या व्हिडिओ कुठे नाही आहे, पण आम्हाला डिव्हीडी मिळेल बहुतेक.
(माझा वर एक फोटो आहे तेवढा पुरे. )
आमचा हा कार्यक्रम 'क्लोजिन्ग सेरेमनी' होता. शेवटच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर सर्वांना परतीचे वेध लागतात पण त्यानंतरही थांबून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मग हा
मग हा कार्यक्रमपण आपल्या ए. वे. ए. ठि. ला करणार का? जसा विनय त्यांचा कार्यक्रम करणार आहेत तसा? निदान तुमचा भाग तरी?
हो, करेन की
हो, करेन की त्यात काय! गोंधळच तर घालायचा आहे..
कूल लालू.
कूल लालू. मस्तच.
इथले काही
इथले काही फोटो, ज्यांचे होते त्यांनी, विनंती केली म्हणून काढून टाकले आहेत.
श्या! फोटु
श्या! फोटु आले बी आणि गेले बी. :p
व्हिडिओच
व्हिडिओच पहा आता.
हा कार्यक्रम 'मराठी बाणा' च्या धर्तीवर असला तरी असा पहिला कार्यक्रम(रन्गतरन्ग) 'बाणा' च्या अडीच वर्षे आधी न्यूजर्सी मध्ये मयूर देवलनीच केला होता. नंतर थोडे बदल होऊन तो 'मनात नाचते मराठी' नावाने वॉशिन्ग्टनच्या मंडळात केला. 'बाणा' वरुन संकल्पना घेतली असे वाटू नये म्हणून हा खुलासा.
वा लालू -
वा लालू - आणिक मराठी मंडळ डी सी.
व्हिडीओची वाट बघतो.
व्हिडिओ
व्हिडिओ कधी मिळणार बघायला?
हा
हा कार्यक्रम मी zagmag.com वर कार्य्कमाच्या दिवशी पाहीला. खरच सुरेख झाला. आणि हौशी कलाकारांनी छान सादर केला.
या कायक्रमचि सहिता जर मिलालि
या कायक्रमचि सहिता जर मिलालि तर खुप बर होएलि. कारन आम्हि सुधा असाच कर्यक्रम करायच विचार करतोय. आम्च्य मुलुन्द मधे.