Submitted by अजय on 7 July, 2009 - 21:56
"शेवंतीचं बन" हा अभिजात मराठी लोकसंगीतावर आधारीत कार्यक्रम अधिवेशनात सादर झाला. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. कधीही पहायची, ऐकायची संधी मिळाली तर अजिबात चुकवू नये असा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरच, फार
खरच, फार सुरेख कार्यक्रम. नाना पाटेकरलासुद्धा त्याचा मोह आवरला नाही. तोही येऊन थोडा वेळ ऐकून गेला.
अगदी सार्थक झाले पण तो पाहायला गेल्याचे. याचे श्रेय मात्र 'दिवसा तू आणि रात्री मी'ला. ते नाटक अतिशय रटाळ असल्याने आम्ही उठून आलो आणि जवळच 'शेवंतीचे बन' नुकतेच सुरू होत होते तिकडे गेलो. काय आवाज होते सगळ्यांचे, अतिशय उच्च कार्यक्रम.
अरे रे!
अरे रे! आमचा चुकला हा कार्यक्रम. व्हिडीओ कुठे अपलोड केलेत का कोणी. कलाकार, गाणी यांची माहिती लिहा कोणीतरी ....
माधुरी
माधुरी पुरंदरे आणि चंद्रकांत काळेंचा कुठलाच कार्यक्रम चुकवण्यासारखा नसतो.
प्रीतरंग मधील सर्वच कविता टेरिफीक, वादातीत निवड आणि चंद्रकांत काळे ऑसम---छे ग आता कशी रहावी, हल्ली हल्ली फुलु लागल्या, तुझे गरम ओठ, मुकुंद फणस़ळकर- डाळींबीच्या डहाळीशी नको वा-यासवे झूलू, माधूरी- ठेव रे विश्वास थोडा, काल पानोठ्यावरती बाई गेले मी पान्याले , अमृतगाथा (?), त्यातले त्यांचे हमाम्मा रे पोरा, निळे हे व्योम, राजस सुकुमार मदनाचा पुतळा अफलातून आणि साजणवेळा- सगळेच ग्रेट.
प्रीतरंग पाहून तर आनंद मोडकांचे पाय धरावेसे वाटले होते, अजूनही वाटतात. काय चाली आहेत.
हा पाहिला नाहिये, पण आता पाहणार. धन्यवाद.
पेटीवर कोण आहे ? आणि माधुरीताईंच्या शेजारच्या बाई कोण ?
माधुरीताई
माधुरीताईंच्या शेजारी प्राची दुबळे. मस्त आवाज आहे तिचा.
या कार्यक्रमाचं संगीत आनंद मोडकांचं आहे. गाणी श्री. ना. धों. महानोर यांनी लिहिली व संकलित केली आहेत.
याच संचात 'ज्वाला आणि फुले' या कार्यक्रमाचे प्रयोग होतात. बाबा आमट्यांच्या कवितांवर हा कार्यक्रम आहे. पहिला प्रयोग आम्ही दोन महिन्यांपूर्वी केला होता. चंद्रकांत काळे, प्राची दुबळे, रवींद्र साठे, माधुरी पुरंदरे, गौरी लागू, आणि संगीत आनंद मोडक यांचं. नाना पाटेकरांनी मुलाखतीत मंजिरी परांजप्यांचा उल्लेख केला, त्यांचं दिग्दर्शन आहे. मस्त आहे हा कार्यक्रम.
विषयांतराबद्दल क्षमस्व.
***
चेहरों के मेले में चेहरे थे गुम, एक चेहरा था मैं एक चेहरा थे तुम
जाने क्या, तुम ने दे दिया, मुझ को जहाँ मिल गया..
हायला
हायला ज्वाला आणि फुले ? पिताजींना जायला सांगायलाच हवे. धन्यवाद चिनुक्स.
याच्या सीडी वगैरे आल्यात कारे?
मी प्रीतरंगसाठी अनेक वेळा अलुरकरांकडे खेटे घालून "किमान शब्दात कमाल अपमान" (सं: टचेआले) करुन घेतलाय.
शेवटी म्युझिक बँक मध्ये मिळालं .
इतका सुंदर कवितांचा कार्यक्रम पुन्हा कधी पाहिला नाही. सुमारे १३ वर्ष झाली असतील पाहून. अजून लख्ख आठवतोय. आणि काय एनर्जीने करतात हे लोक. उफ्फ..
अर्र्र
अर्र्र आमचा चुकला हा, आम्ही धरोधरला गेलो होतो राहुल देशपांडे आणि शौनक अभिषेकीच्या. अर्थात तो कार्यक्रम ही अत्यंत छान होता. एकाच वेळी अनेक कार्यक्रम चालू असल्याने कुठे जाव याचा गोंधळ होत होता,
कार्यक्रम
कार्यक्रम सुरेखच झाला. मी थोडा वेळ बघून धरोहरला जायचा विचार करत होतो. पण तिथून पायच निघेना.
हा शेवंतीचे बनचा ७५ वा प्रयोग होता.
पेटीवर प्रसिद्ध ऑर्गनवादक राजीव परांजपे आणि ढोलकीवर अशोक गायकवाड होते. हे सर्व घाशीरामपासून एकत्र आहेत म्हणे.
रैना,
अधिवेशनात ग्रंथाली/मॅजेस्टीकच्या स्टॉलवर त्यानी एक mp3ची cd ठेवली होती ज्यात त्यांच्या ७ कार्यक्रम आहेत. ती मीळाली तर पहा.
खालील कार्यक्रम आहेत.
शेवंतीचे बन
नाटक्याचे तारे
काव्येर कथा
साजण वेळा
अमृतगाथा
प्रीतरंग
आख्यान तुकोबाराय.
समीर- ती
समीर- ती मिळाली तर तुला माझ्याकडून एक लंच.
प्राणपणाने शोधणार.
रैना,
रैना, माझ्यासाठी पण एक घेऊन ठेव मग. (आणि समीरला दोन लंच दे. :P)
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
माझाही हा
माझाही हा कार्यक्रम चुकला. पण 'धरोहर' सुद्धा उत्तम झाला. शोनूने आधी जाऊन जागा पकडल्याने दुसर्या रांगेत बसून पाहिला. नाना सगळीकडे थोडा थोडा वेळ जात होता वाटतं. 'धरोहर' ला येऊन गेला, 'कार्यक्रम छान चाललाय' अशी नोट स्टेजवर पाठवली होती ती वाचून दाखवली.
'साजणवेळा' मला मिळाली तिथे. २ सीडीजचा संच आहे.
'साजणवेळा'म
'साजणवेळा'मधे वैष्णवीतल्या कविता आहेत हे तू शोनूला सांगितलंस का?
बाकी सगळीकडे एकमेकांसाठी जागा धरल्याबद्दल सगळ्याच मायबोलीकरांचे (आमच्या कुटुंबियांतर्फे स्पेशल) आभार.
मी पण 'धरोहर'ला असल्यामुळे हा चुकला. पण धरोहरही अप्रतीमच झाला. आणि पुन्हा हाच चॉइस दिला तर मी पुन्हाही बहुधा तोच निवडेन.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
रैना,
रैना, माझ्यासाठी पण घेऊन ठेव एक सीडी - मी तुला गजाली मधे नेईन
लालू -पाटलांचं पुस्तक अन साजणवेळा सीडी साठी माझा नंबर लावून ठेव प्लीज.
साजणवेळा
साजणवेळा ऐकुन/पाहून ज्यांना गरगरत नाही त्यांनी हात वर करा पाहू.
स्वाती आणि शोनू तुमच्या आर्डरी नोंदवल्यात. मिळाल्या की कळवते.
समीर- आपण सांगीतलेली एकत्रीत
समीर- आपण सांगीतलेली एकत्रीत कार्यक्रमाची फीत मिळाली. अ प्र ति म आहे. धन्यवाद धन्यवाद.
लंच इज ऑन.
अजय- हे इथे टाकल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
आर्डरी नोंदवल्यात त्या सर्वांसाठी. मी अजुन सीडीज च्या शोधात आहे. मिळाल्या की घेऊन ठेवेनच तुमच्यासाठी.
ठेव रे विश्वास थोडा...
ठेव रे विश्वास थोडा... माधुरी पुरंदरे यांच्या आवाजातील ट्रॅक किंवा विडिओ आहे का कुणाकडे? असेल तर प्लिज द्या न