ववि २००९: सांस्कृतिक कार्यक्रम पोस्ट क्र - २ : ओळख परेड

Submitted by ववि_संयोजक on 3 July, 2009 - 01:02

'प्राची' त 'ची' 'गच्ची' त 'ची'
ओळख करुन द्यायला लागते का?
'वविसंयोजकां''ची'

आलं का लक्षात?? नाही?? मग हे घ्या...

मजेमजेच्या खेळांची दरवर्षी,
तुम्हाला द्यायला प्रचिती..
मी करते काम
मी 'वविसांस्कृतिक समिती'..

समझे?? नाही?? मग मातेकडून ऐका...

गावातल्या लोहाराचं दैवत ऐरण आणि भाता
ववि यशस्वी व्हावा म्हणून देते आशिर्वाद 'श्रमाता'..

हां.. आत्ता समजलं ना?? चला, आजी बाईची मदत घ्या.

सात समुद्र ओलांडून गेली माझ्या पुलावाची किर्ती
मी 'मीन्वाज्जी' आन मायबोलीवर माज्या कितीक नाती.

उखाण्याची पुस्तकं शोधायला सुरूवात करा..

नाव नाव करू नका गजर.
मी आहे 'नंदिनी' इथे वविला हजर

तुमचीच ओळख तुम्ही करून द्यायची आहे सर्व वविकरांना. ...उखाण्यातून... अर्थात तुम्ही स्वतःच नाव घ्यायचय.

मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वविमधे आपण आपली ओळख करुन द्यायची आहे आणि तीही या मजेशीर खेळातून..

स्वतःचं नाव घेताना अजून कुणाकुणाची नावं तुम्ही त्यात गुंफलीत तर ते चालू शकेल हं Wink पण आपलं नाव (मायबोली आयडी अथवा खरं नाव) आणि ओळख हवीच.

तुमची ओळख सांगताना तुम्ही तुमच्या आवडीनिवडी, तुमचं मायबोलीशी असलेलं नातं किंवा इतर काहीही जे तुम्हाला स्वतःबद्दल इतरांना सांगावसं वाटतंय ते सांगू शकता.

चला तर मग करा सुरुवात.. अरे हो! एक राहीलंच.. हा मजेशीर खेळ आम्हाला कुणामुळे सुचलाय ते सांगायला नको का ..? .... मी कशाला सांगू त्याच्याच तोंडून ऐका.. Happy

जळी स्थळी काष्ठी पाषाणी मला दिसते जनी
नाव माझं 'स्लार्टी' हळूच सांगतो कानी..

तर स्लार्टी यांना या आयडीआच्या कल्पनेसाठी धन्यवाद...
वॉट अ‍ॅन आयडीआ सरजी !!!!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीनू,
एकाच उखाण्यात २-२ आयडी .. हे केवळ तूच करु शकतेस Proud
येडी नावाचा आयडी होता. अपडेट युवरसेल्फ आज्जे!

मीन्वाज्जी : तुम्ही ओळख करून दिलीत ना माझी ............. Happy

अंजीर बर्फी, मँगो केक
यांचीच चलती माबोवरती
उपवरांना मदत करता
सगळे म्हणती मलाच वैनी

~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

लिंबू, प्रयत्न चांगला होता. पण काही गोष्टी काल्पनिक आहेत. उदा. मळवट भरून. अशक्य! पण असो.
Lol

Lol

--------------------------------------------
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

माबोचा मी सलिम अली
दिसला पक्षी चित्रे काढी
फिरायला गेलो मी दुरच्या रानात
डकवली चित्रे अंतर्जालात
चित्रावर दिला लोकांनी गड्डा झब्बू
प्रशासकाने मात्र दिला तरिही डच्चू

Light 1 Light 1

लिंबू, तू मला अजूनही नीट पाहिलेले दिसत नाहीये किंवा ओळखलेले नाहीयेस. ठीके. Happy
शिवाय उखाण्यातली ओळख ही मायबोलीवरच्या आयडीची आहे. अर्थात आयडी ची मायबोलीवर दिसून येणारी वैशिष्ट्ये याविषयी. त्यामुळे व्यकिशः ताशेरे ओढण्याचे कारण नाही. येथे तुझ्यावव्यतिरिक्त कुणीही तसे केलेले नाही याची नोंद घे. असो.
टण्या! Lol

नेहेमीप्रमाणेच, आशू तुझाही काही गैरसमज होतो आहे!
अर्थात एरवीच्या आवेशातल्या ज्युनियर माता वा देवीरुपातील तुझ्या आयडीचे वर्णन ज्याप्रकारे वर केले आहे ते तुला "वैयक्तिक ताशेरे वाटत" असतील तर अशक्य आहे
अर्थातच
असन्गाशी सन्ग, प्राणाशी गाठ हे तत्व वा म्हण वा वाक्प्रचारातील तथ्य विसरून, मी इथे येऊन काही पोस्टलो, हीच माझी पहिली चूक, त्यातुन तुझ्याबद्दल पोस्टलो ती दुसरी चूक! जमल्यास या चूकान्बद्दल माफी असावी!
दुसरी बाब, माझ्याव्यतिरिक्त कुणी तसे केले वा न केले हा प्रश्णच माझ्याकरता उद्भवत नाही, कारण मी पोस्टलेलो तु किन्वा कुणावर "वैयक्तिक ताशेरे" आहेत असे माझे मत नाही, अन माझ्या व्यतिरिक्त कुणी तसे केले असेल तर जेव्हा माझ्याशी त्याचा अर्था अर्थी वा दुरान्वयाने सम्बन्ध येतो तेव्हा मी त्याला योग्य ते उत्तर देतोच, जसे की दिपुर्झाला दिले आहे याच बीबीवर Happy

लिंबू, माफी वगैरे मागण्याइतकी काही चूक झाली नाहीये. आणि कदाचित तुला तसं वैयक्तिक काही म्हणायचं नसेलही. तुझ्या पहिल्या पोस्टला मी दिलेला प्रतिसाद वाच पुन्हा एकदा. ती मी मजेवारीच घेतली होती. परंतु दुसरी पोस्ट मला ऑफेंडिंग वाटली इतकंच. त्यामुळे वर तू स्पष्ट केल्याप्रमाणे तुझा तो हेतू नसेल तर प्रश्नच मिटला. Happy अजून एक, जरा कुठे स्पष्ट बोलले तर तुला असंगाशी संग केल्याचा पश्चात्ताप होत असेल तर तुझा तूच विचार कर याबाबत. याविषयावर माझी लेखनसीमा.

करू नका इथे टीपी जास्त दुखतंय माझ्या पोटात
मंजूडीचं वविला येणं आहे तळ्यात-मळ्यात

Pages