'प्राची' त 'ची' 'गच्ची' त 'ची'
ओळख करुन द्यायला लागते का?
'वविसंयोजकां''ची'
आलं का लक्षात?? नाही?? मग हे घ्या...
मजेमजेच्या खेळांची दरवर्षी,
तुम्हाला द्यायला प्रचिती..
मी करते काम
मी 'वविसांस्कृतिक समिती'..
समझे?? नाही?? मग मातेकडून ऐका...
गावातल्या लोहाराचं दैवत ऐरण आणि भाता
ववि यशस्वी व्हावा म्हणून देते आशिर्वाद 'श्रमाता'..
हां.. आत्ता समजलं ना?? चला, आजी बाईची मदत घ्या.
सात समुद्र ओलांडून गेली माझ्या पुलावाची किर्ती
मी 'मीन्वाज्जी' आन मायबोलीवर माज्या कितीक नाती.
उखाण्याची पुस्तकं शोधायला सुरूवात करा..
नाव नाव करू नका गजर.
मी आहे 'नंदिनी' इथे वविला हजर
तुमचीच ओळख तुम्ही करून द्यायची आहे सर्व वविकरांना. ...उखाण्यातून... अर्थात तुम्ही स्वतःच नाव घ्यायचय.
मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वविमधे आपण आपली ओळख करुन द्यायची आहे आणि तीही या मजेशीर खेळातून..
स्वतःचं नाव घेताना अजून कुणाकुणाची नावं तुम्ही त्यात गुंफलीत तर ते चालू शकेल हं पण आपलं नाव (मायबोली आयडी अथवा खरं नाव) आणि ओळख हवीच.
तुमची ओळख सांगताना तुम्ही तुमच्या आवडीनिवडी, तुमचं मायबोलीशी असलेलं नातं किंवा इतर काहीही जे तुम्हाला स्वतःबद्दल इतरांना सांगावसं वाटतंय ते सांगू शकता.
चला तर मग करा सुरुवात.. अरे हो! एक राहीलंच.. हा मजेशीर खेळ आम्हाला कुणामुळे सुचलाय ते सांगायला नको का ..? .... मी कशाला सांगू त्याच्याच तोंडून ऐका..
जळी स्थळी काष्ठी पाषाणी मला दिसते जनी
नाव माझं 'स्लार्टी' हळूच सांगतो कानी..
तर स्लार्टी यांना या आयडीआच्या कल्पनेसाठी धन्यवाद...
वॉट अॅन आयडीआ सरजी !!!!!!
ए जे वविला
ए जे वविला येणार नाही आहेत त्यांनी इथेच ओळख करुन द्या बरं चटचट..
नको!! २
नको!! २ किलोमीटर लांब एकच पोस्ट पडेल पहिली! की पुढच्या वाचायचे त्राणच उरणार नाहीत .
सहीये हे!
सहीये हे! मी माझी २० पानी उघडतेच आता
-------------------------
God knows! (I hope..)
ए, याच्यात
ए, याच्यात एक छोटासा बदल करता येईल का? म्हणजे जी मायबोलीकर कपल्स
आहेत त्यांनी एकमेकांची नावं अशी मजेशीर उखाण्यात घ्यायची. अजूनच धमाल येईल.
ए जे वविला
ए जे वविला येणार नाही आहेत त्यांनी इथेच ओळख करुन द्या बरं चटचट..
>>>
तरीच स्लार्ट्याने इथेच ओळख करुन दिली वाटते.
मीन्वाज्जींच्या सुचनेनुसार इथेच ओळख करुन देत आहे: (आता जे मला ओळखतात त्यांना कशाला ओळख करुन द्यायला पाहिजे. आणि जे ओळखत नाहीत, त्यांना ओळख करुन देत नाहिये म्हणुनच ओळखत नाहीत. मग कशाला ओळख करुन द्या? )
करत बुप्रादेवीचा गजर, गेलो मी वारीला
३७७ कलमाचे नाव घेत, पसंती देतो टणीला
आय्या टणी
आय्या टणी म्हणजे 'हा' आहे का? म्हणजे टणी पण टण्या आहे का...की टण्या टणी आहे ? म्हणजे आम्ही ज्याला टण्या म्हणून ओळखतो तो ट्ण्या आहे की ट्णी...
छे ! उखाण्यात ३७७ आल्यामुळे किती घोळ होतोय..
तरीच स्लार्ट्याने इथेच ओळख करुन दिली वाटते>>> हे काय बरोबर नाय हा स्लार्ट्या आधीच सांगून ठेवतेय..
३७७
३७७ आल्यामुळे किती घोळ होतोय >>
--------------------------------------------
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...
मीनू तुझा
मीनू तुझा तर्कशास्त्राचा अभ्यास पण कच्चा आहे (जसा नाशाचा कच्चा आहे हे काल सिद्ध झाले होते). जसे बुप्रा आणि वारी हे विरोधी तसे ३७७ आणि टणी हे विरोधी (म्हणजे हेटेरो हो.. प्लीज नोट.. च्यायला माझं लग्न होउच नये अशी पुरेपुर व्यवस्था माबोवर होत आहे. त्यामुळे 'काका मला वाचवा' असा आधारगट सुरु करावा का? )
'काका मला
'काका मला वाचवा' असा आधारगट >>> तुझं लग्न होत नाही यासाठी काकांनी काय करणं अपेक्षित आहे रे? पांशा!!!
-------------------------
God knows! (I hope..)
'काका मला
'काका मला वाचवा' असा आधारगट >>> पांशा पांशा.
हल्ली कुठेही कसलीही मदत मागायची फॅशन दिसत आहे. आज किती जण पोपटाने कशी मदत केली ते पाहून आलात? खरे सांगा.
पण टण्या
पण टण्या का म्हणे इथे उखाणा घेतोय??? तो नाहीये का वविला???
हे उखाणे
हे उखाणे दोन ओळीन्चेच असावे लागतात का?
कोणतरी कृपया मला पण सुचवा ना छानसा उखाणा
बायकोला
बायकोला विचार. लग्नात तिने तुझ्या नावचा घेतलाच असेल.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
हे उखाणे
हे उखाणे दोन ओळीन्चेच असावे लागतात का?>>>मोठा उखाणा चालेल बहुधा पण अगदी दोन किलोमीटर लांब नको.. नाहीतर संयोजकांना ओळख करुन द्यायला १ मिनीटापेक्षा जास्त वेळ घेऊ नये अशी लिखीत सूचना द्यायला लागेल..
मी माझी २०
मी माझी २० पानी उघडतेच आता >>>>>> माझी आयडिया ढापलिस ना वैनी ...........
असो मी माझी ४० पानी वही आणणारे या वविला ............
~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही
लिंबू,
लिंबू, सगळंच काही लिहून दाखवावं लागत नाही! शेवटच्या ओळीच्या आधीच्या ओळीत इतरांनी ओळखले नाहीच असे गृहीतच धरलेले आहे.. जे त्या उखाण्याला अनुसरुन आहे.
आशू डे आज
आशू डे आज काय एलटीच्या मागे हात धुऊन ?
--------------------------------------------
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...
दीप्या, मी
दीप्या, मी जागोजागी दिवे लावलेत. तू तेल घालू नको.
ए तेल नाही
ए तेल नाही घालत्ते मी
घ्या अजून एक सुचवतो
वयस्कर माणसाला इतकं नाही छळू
एलटीचा आवडीचा विषय आहे गळू
--------------------------------------------
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...
लिंब्या,
लिंब्या, आशु, दीप्या
दिप्या
दिप्या तुला हा चालेल का रे उखाणा.. ?
मी देतो चॅलेंज..
कुणी लिहीली जर कविता
मी आहे दिप्या...
मायबोलीवर रोजचा माझा राबता..
अ. आ खास तुमच्यासाठी...
येतो म्हणलं मी, घेऊन चाळीस पानी वही
मी अरुण, अरेच्चा! पण ओळख करुन द्यायला कुणीच नाही.... (पळा पळा... )
कोण कसे ते
कोण कसे ते मला सगळं विचारा
मी लिंबू, भलताच मी बिच्चारा!!
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
मीनू
मीनू
माझ्यासाठी पण दे की!
माझ्यासाठ
माझ्यासाठी पण दे की!
>>> मीनुला पेटवू नका हं
मीनु, तुला काम आहे ना खूप, जा बरं
-------------------------
God knows! (I hope..)
वविची
वविची तारिख नक्की झाली
मा. बोलीकरांची धांदल उडाली
नविन चश्मा, नविन काठी
मीन्वाज्जींची तयारी झाली
हे चालेल का हो संयोजक ...............
~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही
किती सांगू
किती सांगू मी सांगु कुणाला
आता वविचा प्लॅन की हो ठरला
पोस्टोपोस्टी दिवे देतादेता
आशू मातेने उद्धार की हो केला
~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही
अ.आंनी वही
अ.आंनी वही उघडलीच शेवटी!
मस्त होता अ.आ!
हे चालेल
हे चालेल का हो संयोजक >>> हे नाय चालणार तुमची स्वतःची ओळख करुन द्या..
पूनम.... थांब आता लिहीतेच..
कलम १३१२ सांगून लोकांना बनवते येडी
ओळखलंत ना मला मी आशु_डी
आज्जे
आज्जे
माबोवर सगळे लोक म्हणतात मला आज्जी
पाऊस आला की अतल्याला करायला सांगते मी भज्जी
--------------------------------------------
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...
अरुणराव
अरुणराव वा! बर्या जमल्यात!
येडी!!!!
-------------------------
God knows! (I hope..)
Pages