माझ्या असण्यातलं मर्म कळून घ्यावं म्हणतो
आता तरी स्वत:चं असं जगून घ्यावं म्हणतो
उरलेत मनात काही आभास काही पुरावे
काही शब्दांचे तर काही निशब्द दुरावे
शब्दांमधूनच त्यांना सांधून घ्यावं म्हणतो
आता तरी स्वत:चं असं जगून घ्यावं म्हणतो
आहेत काही कोमेजलेली फुलं, सुकलेली फळं
आहेत वणव्याच्या भितीने बुजलेली बिळं
वणव्यात स्वत:च्याच जळून घ्यावं म्हणतो
आता तरी स्वत:चं असं जगून घ्यावं म्हणतो
तशी जगण्याला रोज सारखिच गति आहे
थांबलो की संपलो.. अनामिक भिती आहे
आज जरा वेगळ्या वाटेने वळून घ्यावं म्हणतो
आता तरी स्वत:चं असं जगून घ्यावं म्हणतो
आहे कुठेतरी देहात एक ओथंबलेला श्वास
अन निश्वासाच्या शोधात ओढावलेला त्रास
तरी एका मोकळ्या श्वासानं हसून घ्यावं म्हणतो
आता तरी स्वत:चं असं जगून घ्यावं म्हणतो
तशी जीवनाशी जिंकण्याची सवय लागली आहे
दुनियाही आत्तापर्यंत मनासारखी वागली आहे
आता निदान स्वत:शीतरी हरून घ्यावं म्हणतो
आता तरी स्वत:चं असं जगून घ्यावं म्हणतो
ह्म्म! छान
ह्म्म! छान देवा!
good one!
Good one! शेवटचं कडवं मात्र उर्वरीत कवितेशी नीटसं जुळतंय असं वाटलं नाही.
संदीप खरे style आठवली.
- परागकण
मस्त
मस्त रे , आवडली कविता
भिडलं......मन
भिडलं......मनाला भिडलं....
आता निदान स्वत:शीतरी हरून घ्यावं म्हणतो....हे जरा खटकलं!
बाकी अप्रतीम!
व्वा!
मस्त कविता.
देवदत्त पहिल्या दोन ओळींनी पुढेही त्याच ठेक्याची अपेक्षा करायला लावली. आणि मग वाचताना (कदाचीत उगाच अडेलपणे) अडखळायला झालं. (अर्थात मला.)
धन्यवाद
धन्यवाद मंडळी...

PK, पल्लवी विचार करेन त्यावर..
मेघधारा.. I didnt want to compromise on अर्थ.. म्हणून लयीवर compromise केलं..
मस्त!
देवा सहीच!