Submitted by मीन्वा on 28 December, 2007 - 02:47
तू भेटलास.
मेदीचा रंग चढायला लागला होता,
गडद.. छे! काळीच ..!
काळी झालेली मेंदी तुला दाखवताना,
गालावरही चढायचा मेंदीचा गुलाबी रंग.
काही वर्ष उलटून गेलीत मेंदी काढून,
आता रंगेल अशी खात्री नाही वाटत
राहून राहून आठवण येते कपाळावरच्या
कधीच न रंगलेल्या मेंदीच्या ठीपक्याची..
गुलमोहर:
शेअर करा
लय भारी!
मीनु,
सुरेख आणि वास्तववादी कविता आहे ही. कपाळीचा न रंगलेला ठीपका.. ही उपमा तर केवळ उच्च!
छान
छान जमलि आहे कविता...
काही वर्ष उलटून गेलीत मेंदी काढून,
आता रंगेल अशी खात्री नाही वाटत
राहून राहून आठवण येते कपाळावरच्या
कधीच न रंगलेल्या मेंदीच्या ठीपक्याची..
या ओळी तर आरपार गेल्या ग...