Submitted by अनन्त्_यात्री on 16 April, 2025 - 00:20
जर्द पिवळी दुपार
दार ठोठावत येते
आत आत कोंडलेले
झळीनेच धुमसते
घोर फुफाटा धुळीचा
अणु रेणू तापलेला
मृगजळाच्या काठाशी
निवडुंग फोफावला
गारव्याची शीळ निळी
विजनातून घुमते
तिथे पोचायचे कसे?
बेडी पायात काचते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गारव्याची निळी शीळ ऐकू आली
गारव्याची निळी शीळ ऐकू आली तरी महद्भाग्यच !!
छान लिहिलीय..
छान लिहिलीय..
गारव्याची शीळ निळी
गारव्याची शीळ निळी
विजनातून घुमते
तिथे पोचायचे कसे?
बेडी पायात काचते
कविता सुंदरच , हे कडवं कळसच...
सुंदर कविता. आवडली.
सुंदर कविता. आवडली.
वा!
वा!
सुंदर, फारच आवडली.
सुंदर, फारच आवडली.
सुंदर!
सुंदर!
प्रतिसाद देणाऱ्या सर्व कविता
प्रतिसाद देणाऱ्या सर्व कविता-रसिकांना धन्यवाद