नसलेल्या बोटाची गोष्ट
इन्स्पेक्टर दळवी चौकीत वर्तमानपत्र वाचत होते. बाकी काय तशी शांतता होती. पीएसआय मते आणि हवलदार शिंदे गप्पा मारण्यात गुंतले होते. गाव तसे शांत होते उगीचच कुठेतरी मारामाऱ्या, नवरा बायकोची भांडणे अशीच भांडणे पोलीस चौकीत यायची. दळवी बहुतेक सर्व भांडणे परस्पर मिटवून टाकायचे त्यामुळे कुठल्याच गुन्ह्याची नोंद होत नव्हती.
अकराच्या सुमारास बाबू कसबे चौकीत आला. आल्या आल्या तो गवळी समोर बसला. साहेब माझी कंप्लेंट लिहून घ्या. बाबू ना?, हाजामलच्या पेढीवर काम करतोस ना?. होय साहेब. माझी कंप्लेंट लिहून घ्या. काय झालं कंप्लेंट द्यायला?. साहेब माझी बायको बेपत्ता झाली आहे. बायको बेपत्ता झाली? कशी? तू भांडला असशील तिच्याशी. गेली असेल एखाद्या नातेवाईकाकडे. नाही हो साहेब दर दोन आठवडे ने ती माहेरी जाते, बारावीचे काही विषय राहिले आहेत त्याचा अभ्यास करते मैत्रिणीबरोबर म्हणून सांगते. मी आहे अंगठा बहादुर. मला तर काही कळत नाही. 'बाबू'
हे बघ बाबू, जरा तू तिच्या मित्र-मैत्रिणीकडे चौकशी कर. आत्ता मी कंप्लेंट लिहून घेत नाही.
माझी कंप्लेंट लिहून घ्या. उद्या माझी बायको मेली तर मी सरळ तुमच्यावर आरोप करीन 'बाबू'
बर, मते घ्या बाबूची कंप्लेंट लिहून . बाबू बस. बाबू वीणाची माहिती सांगू लागला. वय २४ वर्ष, बायकोचं नाव वीणा बाबू कसबे. राहायचं ठिकाण २७ तेली गल्ली, खोली क्रमांक 24.
बायकोला केव्हा पाहिली शेवटची ?.
१८सप्टेंबर सकाळी.
भांडून गेली का?
नाही बुवा स्वयंपाक केला मला म्हणाली जेवून जा आणि गेली.
बरोबर कोणी होतं का? नाही ती एकटीच जाते.
कुठे गेली?
हुपरीला तिच्या माहेरी.
माहेरी केव्हा पोहोचली?
ती पोहोचली नाही. तिची बहीण पण काळजीत पडली आहे.
अंगावर कपडे काय होते ? 'साहेब'
गुलाबी साडी आणि लाल ब्लाऊज होता. केसांचा खोपा घातला होता.
दागिने घेऊन गेली का?
अंगावरती ते नेहमी असतात तेवढेच होते. हातात बांगड्या, गळ्यातील साखळी आणि मंगळसूत्र.
कुठल्या दुसऱ्या मैत्रिणीकडे किंवा दुसऱ्या नातेवाईकाकडे गेली नाही ना?
नाही साहेब काही कळत नाही. ठीक आहे.तिचे वर्णन? साधारणता पाच फूट दोन इंच उंची आणि मध्यम बांध्याची . तिचा फोटो आणून दे. ही सर्व माहिती आम्ही सोलापूर हद्दीतील आणि कोल्हापूर हद्दीतील सर्व चौक्यांना पाठवतो. तुलाही काही कळले तर लगेच आम्हाला सांग. बाबू मान हलवत निघून गेला.
पी एस आय मते यांनी एक सोपे वर्णन तयार केले आणि बाबूच्या फोटोची वाट पाहू लागले. काही वेळाने बाबू फोटो घेऊन आला. त्यांनी लागलीच सर्व माहिती सोलापूर कंट्रोल रूमला प्रसिद्धीसाठी पाठवली. त्याचबरोबर हुपरीच्या पोलीस स्टेशन मधील पीआय गवळी यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही मिसिंग केस सांगितली.
बाबू रोज सकाळ-संध्याकाळ चौकीवर फेऱ्या घालत होता पण त्याला सांगण्यासारखं पोलिसांकडे काहीच नव्हते. 28 सप्टेंबर ला अचानक चिकोडी पासून 20 किलोमीटर अंतरावर आणि निपाणी ग्रामीणच्या हद्दीत एक शेतकरी तक्रार घेऊन आला. इन्स्पेक्टर धर्मराज पोलीस चौकीवर हजर होते. साहेब मला मयताची वर्दी द्यायची आहे 'शेतकरी'
तुझं नाव काय आणि तू कुठला? 'पोलीस इन्स्पेक्टर'
मी मल्लाप्पा माझे गाव चिकोडी जवळच. माझ घर माझ्या शेतातच आहे आणि आजूबाजूला अजिबात वस्ती नाही मी गेल्या आठवड्यात कामानिमित्त विजापूरला गेलो होतो पण परत आलो तर माझ्या ट्रॅक्टर शेडमध्ये एक बाई मरून पडलेली. 'शेतकरी'
बाई कशाने मेली आहे 'इन्स्पेक्टर'
मी काही त्यातला डॉक्टर नाही पण बाईच्या डोक्यावर मार बसला असून गुडघ्याच्या वरच्या भाग जळलेल्या स्थितीत आहे. 'शेतकरी'
थांब जरा मी कोणाला तरी तुझ्याबरोबर पाठवतो 'इन्स्पेक्टर '
थोड्याच वेळात त्यांनी एका पी एस आय ला बोलवून एक ग्रुप तयार करण्यास सांगितले. चंद्रा तू एक फिंगरप्रिंट एक्सपर्ट, एक पीएम डॉक्टर, एक कॉन्स्टेबल आणि एक फोटोग्राफर घेऊन शेतकऱ्यांबरोबर जा. चंद्रा आपला ग्रुप घेऊन शेतकऱ्यांबरोबर गेला. शेतकऱ्याकडे चहापाणी झाल्यावर मंडळी कामाला लागले फोटोग्राफरने प्रेताचे बरेच फोटो घेतले त्यानंतर सर्व मंडळी काही पुरावा सापडतो का त्याच्या मागे लागले.
बाई मध्यम बांध्याची असून अंगावर सोन्याची साखळी, मंगळसूत्र असे दागिने होते. तिची पर्स जवळ सापडली. चंद्राने पर्स उघडून पाहिली त्यात 350 रुपये आणि लेडीजचे लागणारे साहित्य होते. पर्समध्ये एक एनवलप होते आणि त्या एनवलप मध्ये एका कागदावर बाईंनी लिहिले होते.
लग्न झाल्यापासून माझे पती माझा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहेत. घरासाठी मी माहेरून दोन लाख रुपये आणावे असा त्यांचा आग्रह आहे. वडिलांचे म्हणणे आहे की, मी तुम्हाला घर बांधून देतो पण पैसा देणार नाही, मग घरासाठी पाच लाख गेले तरी हरकत नाही. याचे कारण म्हणजे लग्नात दिलेले एक लाख रुपये तुझ्या नवऱ्याने दारूत आणि जुगारात घालवले आहे. नोकरी चांगली आहे पण त्याला पैसा सांभाळता येत नाही घरी रोजच्या त्रासाला कंटाळून मी स्वतःवर पेट्रोल टाकून सुसाईड करत आहे.
वीणा कसबे.
आता ही केस आत्महत्येची दिसत होती. तिचा चेहरा अत्यंत ठेचल्यामुळे आणि जळल्यामुळे ओळखणे अवघड झाले होते. मयताच्या अंगावर जळक्या स्थितीत गुलाबी साडी आणि लाल रंगाचे पोलके असावे असे वाटत होते. पीएम डॉक्टर आणि चंद्राने केलेली पाहणीनुसार ती आत्महत्या नसून खूनच असावा असे वाटत होते. तेथे येऊन पेट्रोल घेऊन पेटवायचे तर, आजूबाजूला कुठेही जवळपास काड्या सापडल्या नव्हत्या. त्याचबरोबर पेट्रोलचा कॅन, बादली असे काही पेट्रोल आणायला आणि पेटवून घ्यायला वापरलेले दिसत नव्हते. प्रेत ट्रॅक्टर गॅरेजच्या आडोशाला पडले होते. एका बाजूला येल्लाप्पाचे घर होते त्याला अथवा त्याच्या फॅमिलीला गेल्या आठवड्यात मल्लाप्पाच्या शेडजवळ कुठलाही जाळ दिसला नव्हता. शेवटी केस कलम 302 खाली नोंदवली. आता या केस मध्ये हा गुन्हा कर्नाटक मध्ये घडला होता पण बाई बहुदा महाराष्ट्रातील होती. पुढे हॉस्पिटलमध्ये पीएम रिपोर्ट मध्ये हा खून असल्याचे निश्चित झाले. बाईला प्रथम गळा आवळून मारण्यात आले व नंतर तिला जाळण्यात आले होते. चेहरा ओळखू येऊ नये म्हणून विद्रुप करण्यात आला होता. पुढे पीएम रिपोर्ट मध्ये असेही म्हटले होते की तिला गुंगीच्या औषध देऊन झोपेत असताना तिचा गळा आवळला होता त्यानंतर रिगर मॉर्टिस सेट होण्याआधी तिला जाळण्यात आले होते, त्याशिवाय मयत महिला चार-सहा आठवडे ची गरोदरही होती.
प्रेत सापडल्यापासून हा गुन्हा कुठे घडला हे सांगणे अवघड होते. चंद्राने केसचा संपूर्ण रिपोर्ट तयार करून दिला आणि त्यांनी तो ग्रामीण पीएसआयला फॉरवर्ड केला. हद्दीवर असलेल्या दोन्ही बाजूच्या ठाण्यांनी काही माहिती एकमेकांना देण्यास सुरुवात केली त्यामुळे काही गुन्ह्यांचा तपास चटकन लागत होता त्याप्रमाणे ह्या व्यक्तीची सर्व माहिती, फोटोग्राफ हे महाराष्ट्रातल्या चौकीना देण्यात आले. चौकीतील मिसिंग पर्सन रजिस्टर शोधायला सुरुवात झाली. जवळपास सात दिवसांनी ही माहिती दळवींना दिली आणि त्यांनी बाबुला बोलवणे पाठवले.
काय बाबू वीणा परत आली का?
नाही हो साहेब
मते बाबुला लॉकअप मध्ये घ्या, जरा चांगला पाहुणचार करा. खुनाला कबूल होतोय ना पहा.
त्याचबरोबर गवळींनी निपाणी प्रेत गृहाला फोन करू शरीर ठेवण्यास सांगितले आणि हुपरी ला फोन करून शव ओळखण्यासाठी वीणाच्या आई-वडिलांना व बहिणीला निपाणी यायला सांगितले आणि जर ओळख पटली तर शव महाराष्ट्रात आणण्यास सांगितले. ते स्वतःही निपाणी ला येत असल्याचे कळवले.
दुसऱ्या दिवशी सगळी वरात निपाणीत हजर झाली तोपर्यंत प्रेत टेबलावर ठेवून पांढऱ्या वस्त्रांनी झाकण्यात आले होते. सर्वांनी प्रेताचा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न केला पण चेहरा ओळखण्याच्या पलीकडे गेला होता. त्याचवेळी चेहरा झाकण्याकरता वरची पांढरी चादर जोरात ओढली त्यामुळे प्रेताचे पाय उघडे पडले. थांबा इन्स्पेक्टर दळवी.
काय झाले?
हे प्रेत वीणाचे नाही
कशावरून म्हणता? मगाशी तुम्ही म्हणाला होता की असू शकते.
अहो चेहरा ओळखता येत नव्हता बाकीचे अवयव जळून गेले त्यामुळे ओळखणे अशक्य होते, परंतु बांधा आणि रंग सारखा असल्याने आम्ही असू शकेल असे म्हणालो.
अहो तुम्ही बघा पाय उघडे पडलेआहेत आणि तिच्या उजव्या पायाला एक बोट कमी आहे. आपल्या विणाच्या पायाची पाचही बोटे जागेवर होती त्यामुळे हे प्रेत वीणाचे नाही.
त्या प्रेताचे काय करावे हे आता कर्नाटकच्या पोलिसांना सांगावे लागणार होते त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामधील जवळच्या सर्व तालुक्यांना कुठलीही महिला मिसिंग पर्सनमध्ये असल्यास कळवण्यास सांगितले. त्याचबरोबर हुपरी जवळच्या एका वाडीतील सरिता घुणे ही मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे असे सांगण्यात आले. पोलिसांनी घुणे आई-वडिलांना निपाणी ला जायची विनंती केली.
आई बाबा दोघे हादरले कारण त्यांच्या मुलीला एक बोट कमी होते आणि नंतर तीच सरिता असल्याची खात्री पटली. सर्व सोपस्कार झाल्यावर सरिताच्या प्रेताला अंत्यसंस्कार करिता आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पीएम नोंदीप्रमाणे सरिता चार-सहा आठवडे ची गर्भवती होती
अशा रीतीने बाबूच्या कंप्लेंट नंतर दीड दोन महिन्यांनी त्याची तक्रार आणि सरिता खून प्रकरण अडकून बसले होते. आता दळवी पुढे दोन पेंडींग केसेस होत्या एक म्हणजे मिसिंग पर्सन सरिता. तिचा खून झाल्याचे निश्चित झाल्याने त्याचा तपास करणे जरुरीचे होते परंतु खून कर्नाटक मध्ये झाला असल्याने हा गुन्हा त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता.
वीणा बेपत्ता झाल्याचा गुन्हा सध्या तरी महाराष्ट्र राज्यातच होता आणि ते प्रकरण गवळींना सोडवायचा होता. हे कोडे सोडवायचे कसे हे गवळी पुढे आव्हान होते. अर्थातच ती स्वतःहून बेपत्ता झाली असल्यामुळे कोणताच गुन्हा घडलेला नव्हता, परंतु सध्या तरी ती मिसिंग पर्सन केस म्हणूनच एफआयआर झालेली होती.
वीणा ठरलेल्या तारखेला हुपरीतल्या घरी आली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती नवऱ्याकडे जाते म्हणून निघून गेली होती आणि त्यानंतर कोणालाच काही दिसली नाही हा गुन्हा मिसिंग पर्सन फाईल क्लोज असा ठाव ठिकाण नसल्यामुळे फाईल क्लोज करण्यात आली.
बाबूंच्या पोलिसांकडे फेऱ्याही कमी झाल्या होत्या. आता त्याला पोलिसांकडून मिसिंग पर्सन सापडत नाही असे सर्टिफिकेट पाहिजे होते पण कायद्याने मिसिंग पर्सन सात वर्षांनी मृत घोषित करता येतो त्या अगोदर तो जिवंत आहे असे घोषित केले जाते. त्यामुळे बाबूची पंचायत झाली होती त्याला दुसरे लग्नही करता येत नव्हते.
ऑक्टोबर 24, सरिताची केस शेवटी सीबीआय कडे वर्ग करण्यात आली कारण कलम 302 खाली केस नोंदली गेली होती. पीएम रिपोर्ट मध्ये गुंगीचे औषध, गळा आवळून मारणे, डोक्यावर फटके मारून चेहरा विद्रूप करणे आणि शेवटी प्रेताला दुसरीकडे हलवणे असे बरेच आरोप नोंदले गेले होते. इन्स्पेक्टर केसकर यांनी गुन्ह्याच्या शोधासाठी सुरुवात महाराष्ट्रामधून केली. गावात त्यांनी चौकशीला सुरुवात केली त्यावेळेस सरिता बरोबरच्या बऱ्याच मैत्रिणी सापडल्या. त्यात प्रामुख्याने बबली पुनामिया आणि राणी पाटील या होत्या. राणीचे तर सरिताच्या घरी जाणे येणे होते. दोघींच्या म्हणण्याप्रमाणे सरिताचे बऱ्याच मुलांशी जवळचे संबंध होते आणि ती त्यांच्याबरोबर कोल्हापूर, पन्हाळा अशा ठिकाणी फिरायला जायचे. केसकरांनी ठरवले की हा गुन्हा महाराष्ट्र मध्ये घडला आहे आणि कर्नाटकाच्या हद्दीत प्रेत टाकले आहे. या कामामध्ये केसकरांनी गवळींना बरोबर घ्यायचे ठरवले. दोघेही सरिताच्या घरी तपासणीसाठी गेले. सरिताच्या आई-वडिलांनी दोघांना सरिता प्रेत सापडण्यापूर्वी चार-पाच दिवस अगोदर काही मुलांबरोबर बाहेर गेली होती असे मान्य केले. बहुतेक वेळेस ती एक दोन दिवसात परत येत असल्याने ती परत येऊन माळावर राहण्यास गेली असावी असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी हा मुद्दा पूर्वी गवळींना सांगितला नव्हता. जाताना ती लाल रंगाच्या गाडीतून गेल्याचे त्यांना आठवत होते. गाडीचा नंबर त्यांना माहीत नव्हता अशी गाडी शोधणे अवघड होते. कारण गाडीचे रजिस्ट्रेशन कोल्हापूर किंवा इचलकरंजी मध्ये किंवा पुणे मुंबईमध्ये झाले असल्याची शक्यता होती त्यांनी परत त्यांचे लक्ष राणी कडे आणि बबलीकडे केंद्रित केले. तरी त्याचे कोण जवळचे मित्र होते त्यांची यादी केली त्यात त्यांना पुनामियां यांची मुलगी जास्त खरी माहिती देत असल्याचे लक्षात आले, या मित्रांपैकी कोणाच्या लाल गाड्या आहेत का ? राणी म्हणून गेली की त्याच्याकडे पण एक लाल आय ट्वेंटी आहे तिचा भाऊ बंटी हा सरिताचा खास दोस्त पण आहे.
दोन-तीन दिवसातच बंटी पाटलाला ताब्यात घेण्यात आले आणि पोलीस चौकशीस प्रारंभ झाला. त्याला बेसावध ठेवण्यासाठी केसकरांनी वीणा कसबे च्या खुणाचा आरोप त्याच्यावर ठेवला आणि बेसावध असताक्षणी सरिताच्या खुनाबद्दल त्याला विचारले. त्याच्या लाल गाडीतून त्याने सरिताला तिच्या घरून बाहेर फिरायला नेले होते त्याचे पुरावे पण उपलब्ध आहेत. असे म्हणताच तो सुरुवातीला चटपटला पण नंतर त्याने ते कबूल केले व म्हणाला हो मी तिला आमच्या ज्योतिबा जवळच्या बंगल्यावर नेले होते परंतु दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावात परत सोडले होते. केसकर आणि गवळींनी बंटीला सोबत घेऊन ज्योतिबा जवळ असलेल्या त्याच्या बंगल्यात जायचे ठरवले. दोघेही मुद्दाम पूर्ण पोलीस ड्रेस मध्ये आणि सात आठ पोलिसांना बरोबर घेऊन एका जीप आणि एका निळ्या गाडीतून गेले. बंगल्यात पोहोचतात गवळींना बंटी बरोबर जीप मध्येच बसवून केसकर पुढे गेले. आतून त्यांचा केशर नावाचा गडी पुढे आला. केसकरांनी एका पोलिसाला इशारा करून केशरला बेड्या ठोकायच्या आज्ञा दिली. लांबूनच असे दिसत होते की बंटीला ही अटक होऊन एक पोलीस अधिकारी त्याच्याबरोबर बसला आहे. केशरला घोळात घेणे त्यामुळे केसकरांना अवघड नव्हते. बेड्या बघताच तो चटपटला,
साहेब मला बेड्या कशासाठी?
ते कोर्टात गेल्यावर कळेलच आणि नंतर तुला कोठडीत गेल्यावर टायरमध्ये घालू.
हे ऐकून केशर रडायलाच लागला. केसकर त्याला दरडावून म्हणाले आता रडायला येते आहे पण रांडेच्यानो एका पोरीला मारताना आणि जिवंत जाळताना तुम्ही छान हसत होतात आणि दारू पीत बसला होतात. केशरने पोपटासारखी बोलायला सुरुवात केली. केसकरांनी दुसऱ्या पोलिसांना बोलावले आणि त्याची पाहणी करण्यास सांगितले. तिसरा पोलीस व्हिडिओ रेकॉर्डिंग करू लागला. केसकर यांनी त्याला पूर्णपणे आरोप कबूल करायला लावला त्यांनी सरिताला कशी विस्की पाजली, झोपायच्या गोळ्या कशा दिल्या आणि ती झोपल्यावर तिला बंटीने गळा दाबून कसे मारले ती मेल्यावर केशरने तिच्या डोके कसे फोडले आणि नंतर परसात नेऊन तिच्या अंगावर पेट्रोल ओतून कसे जाळले याची माहिती दिली. केसकरांनी गवळींना खूण केली त्यांनी दोन-तीन पोलिसांना बोलवून बंटीच्या हातात बेड्या घातल्या आणि सरिताबद्दल विचारण्यास सुरुवात केली. गवळीनी बंटीला सांगितले की तिकडे केशर खुन्याची कबुली देत आहे आणि अर्थातच तो गुन्ह्याची जबाबदारी तुमच्यावर ढकलणार आहे त्यापेक्षा तुमच्या बाजूची जबानी जर तुम्ही दिली तर तुम्ही वाचण्याचा संभव आहे. बंटी फारच घाबरला होता आणि त्याने हो म्हटले त्याचीही जबानी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू झाले. त्यांनी सरिताला कसे इथे आणले, तिला दिवस गेले ते सांगितले. कुठल्याही परिस्थितीत सरिताला गर्भपात नको होता आणि बंटीने तिच्याशी लग्न करावे अशी तिची मागणी होती. बऱ्याच वेळानंतर तिला जगातून नाहीसे करण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला. त्याप्रमाणे त्यांनी तिला मारून जाळून टाकले. नंतर तो त्याच्या सफारीने कर्नाटकला गेला आणि स्ट्रेचरच्या साह्याने तिचे प्रेत ट्रॅक्टरच्या शेडमध्ये टाकले. त्याच वेळेस वीणा बेपत्ता झाल्याची बातमी त्यांना कळली होती त्यामुळे हे प्रेत वीणाचेच आहे असे जर पोलिसांना आणि नातेवाईकांना वाटले तर सरिताच्या खुनातून आपली सुटका होईल अशी खात्री होती की त्यामुळे त्यांचा ट्रेस लावणे अवघड होईल. त्यामुळे त्यांनी वीणाच्या नावाने एक चिठ्ठी प्रेताबरोबर टाकली आणि त्याची युक्ती यशस्वी झाली असली तरी पायाच्या एका बोटामुळे ते फसले.
वीणा आणि सरिता एकाच अंगवळणीच्या होत्या त्यामुळे त्याने एक नवीन पर्स घेऊन त्याच्यात बऱ्याच वस्तू आणि सुसाईड नोट टाकली पण केवळ पायाच्या एका बोटाने गोंधळ झाला आणि त्यांचे दुष्कृत्य उजेडात आले. ही केस सोडवण्याकरिता केसकर आणि गवळी यांना अफाट परिश्रम घ्यावे लागले या सर्व धावपळीत वीणा कसबेचा काही ट्रेस लागला नाही. गवळींनी त्या काळात कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र गावातून मिसिंग पर्सन ची सर्व माहिती काढून जवळजवळ 60 केसेस फॉलोअप केल्या परंतु वीणाचा पत्ता कुठेच लागला नाही. केसकर खुनाचा तपास संपल्यावर दुसरीकडे निघून गेले. एक वर्ष उलटले परंतु वीणाचा काही पत्ता लागला नाही. गवळी रिटायर झाले आणि त्यांच्या जागी तरुण इन्स्पेक्टर साने यांनी आल्या आल्या पेंडिंग केसेस मार्गाला लावल्याचा सपाटा सुरू केला परंतु वीणाच्या बाबतीत त्यांना यश आले नाही. रिटायर झाल्यानंतर मी हुपरीला राहू लागलो. एक दिवस भवरलाल पुनामिया त्यांच्या मुला मुलाचा धंदा बघण्यासाठी इंदोरला जाणार होतो गवळी पण त्यांच्याबरोबर निघाले. इंदोरला पुनामिया यांच्या मुलाचे म्हणजेच राजेशचे चांदीची मोठी शोरूम होती आणि त्याचा धंद्या उत्तम चालू होता. दुकानात थांबून संध्याकाळी सर्वजण राजेशच्या घरी गेले. इंदोरच्या पॅलेशिया या भागात त्यांचा मोठा बंगला होता.
संध्याकाळी जेवताना टेबलवर राजेश त्याची बायको तेजश्री पूनामिया आणि गवळी असे होते. विविध केस सोडवताना झालेले प्रॉब्लेम सांगून गवळींनी जेवणात रंग भरला एवढेच केसेस सोडवल्या परंतु वीणाची केस सोडवताना येथे अपयश आले, कुठे म्हणजे कुठेही तिचा पत्ता लागला नाही कदाचित ती झारखंड किंवा मध्य प्रदेश मध्ये गेली असेल तर तिकडचे पोलीस अत्यंत ढिसाळ आहेत. जेवण झाल्यावर सगळे बागेत कॉफी घेत होते राजेश व तेजश्री दोघेही गप्पांमध्ये सामील होते.
ऑ. काही क्लोजर मिळालेच नाही.
ऑ. काही क्लोजर मिळालेच नाही.
नाही म्हणायला तिकडे यातल्या राजेश आणि तेजश्री ची स्टोरी त्या दुसऱ्या धाग्यावर वाचायला मिळाली.