
गोळाभातासाठी :
तांदूळ : २ वाट्या (शक्यतो चिन्नोर किंवा कोलम). भात खूप चिकट व्हायला नको.
बेसन : ४ वाट्या
तांदूळ पीठ : २-३ चमचे
दही : २ चमचे
मसाले : लाल तिखट, हळदपूड, जिरेपूड, धणेपूड, मीठ, हिंग : सगळे चवीनुसार
तेल : ४ मोठे चमचे.
कैरीच्या कढीसाठी
कच्च्या कैऱ्या : २
सुक्या लाल मिरच्या : ४
सुके खोबरे : अर्धी वाटी (किसून घेणे)
आले : १ इंच
जिरे : एक छोटा चमचा
गूळ : जितका कैरीचा पल्प निघेल त्याच्या निम्मा. (कैरीच्या आंबटपणावर गुळाचे प्रमाण अवलंबून असते)
बेसन : दोन मोठे चमचे
घरगुती गोडा मसाला : १ लहान चमचा
फोडणीसाठी : हिंग, मोहरी, कढीपत्ता, मिरची.
गोळाभात
प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवणे.
मोठ्या परातीत गोळ्यांसाठी घेतलेले सगळे साहित्य एकत्र कालवून घायचं. पाणी घालायचं नाही. त्यात चार चमचे मोहन घालून भरपूर चोळून घेणे. मुठीमध्ये घट्ट वळल्यास बेसनाचा मुठा तयार झाला पाहिजे. असे सगळे गोळे तयार करून घेणे.
कुकरमध्ये धुतलेले तांदूळ आणि मीठ घालून भात मोकळा शिजेल इतके पाणी घालावे आणि त्यात तयार करून ठेवलेले गोळे सोडून नेहमी प्रमाणेच ३ शिट्ट्या देऊन भात शिजवावा. (पातेल्यात करत असाल तर भात आधी अर्धा कच्चा शिजवून नंतर त्यावर गोळे घाला आणि पूर्ण शिजवा )
.
कैरीची कढी :
कैऱ्या उकडून गर काढून घेणे
मिरच्या, जिरे, सुके खोबरे आणि आले मिक्सर मधून भरड वाटून घेणे.
खोलगट पातेल्यात फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, एका लाल मिरची आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी करून घ्यावी.
त्यात खोबऱ्याचे वाटण घालून परतून घ्यावे. यातच कोरडे बेसन घालून खरपूस भाजून घावे.
बेसन खरपूस झाले कि त्यात कैरीचा गर आणि गूळ घालावा. गूळ विरघळला की पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे. वरून थोडा गोडा मसाला घालावा. एक उकळी आली कि मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवावे.
१. गोळाभात खाण्याची पद्धत म्हणजे गोळे भातात कुस्करून, त्यावर फोडणीचे तेल घ्यायचे. असेल तर तळलेली सांडगी मिरची चुरायची. आणि मग हादडायचे. आणि कूलरसमोर ताणून द्यायची.
२. हा पदार्थ शक्यतो उन्हाळ्यातच करतात.
३. वाफवलेला दिसत असला तरी भरपूर प्रमाणात तेलाचा वापर असल्याने हा काही सो कॉल्ड हेल्दी पदार्थ नाही . पचायला जरा जडच असतो. त्यामुळे ज्यादिवशी गोळाभाताचा बेत असेल त्यादिवशी जेवणात शक्यतो इतर काही पदार्थ नसतात.
४. गोळाभात आणि कैरीची कढी अनेक प्रकारे करतात त्यातली हि माझ्या आईची पद्धत आहे.
सध्या काही दिवस नागपूरला माहेरपण सुरु आहे त्यामुळे रोज आईच्या हाताचे नवेनवे (कि पारंपरिक?) पदार्थ हादडणे सुरु आहे.
मस्तच दिसतोय फोटो..
मस्तच दिसतोय फोटो..
पण मला एक शंका आहे.
कुकरमध्ये धुतलेले तांदूळ आणि मीठ घालून भात मोकळा शिजेल इतके पाणी घालावे आणि त्यात तयार करून ठेवलेले गोळे सोडून नेहमी प्रमाणेच ३ शिट्ट्या देऊन भात शिजवावा. > पाण्यात गोळे सोडले की विरघळणार नाहीत का ?
पाण्यात गोळे सोडले की
पाण्यात गोळे सोडले की विरघळणार नाहीत का>>>
नाही विरघळत. गोळ्यात दही असल्याने बायडिंग घट्ट राहते
छान रेसिपी.
छान रेसिपी.
आमच्याकडे बेसनाऐवजी हरबरा डाळीची भरड वापरायची आई. मी पण वेळेवरच हरबरा डाळ मिक्सर मधून काढते.
कधी कधी पर्यायी म्हणून सालाची हिरवी मूग डाळ पण वापरते.
मस्तच. गोळा भात कधी खाल्ला
मस्तच. गोळा भात कधी खाल्ला नाहीये .कढीचीपण मस्त आंबटगोड लागत असेल.बाजारात कैऱ्या मिळताहेत, करून पाहणार आहे.
धन्यवाद मानिम्याऊ. कढी
धन्यवाद मनिम्याऊ. कढी लौकरात लौकर करून बघणार. बेसन नीट भाजणे जरा चॅलेंजिंग वाटतंय मला.
मस्त रेसिपी. एकदा ट्राय करणार
मस्त रेसिपी. एकदा ट्राय करणार
मला बेसनाचा मुठा चॅलेंजिंग
मला बेसनाचा मुठा चॅलेंजिंग वाटतोय मिळून येईल का व गोळे नीट राहतील का पाण्यात की विरघळतील दह्या मुळे घट्टपणा येईल म्हणा तरीही.
मस्त रेसिपी वाटते आहे. करुन
मस्त रेसिपी वाटते आहे. करुन बघेन
धन्यवाद साऱ्यांना..
धन्यवाद साऱ्यांना..
<<<<बेसनाचा मुठा चॅलेंजिंग वाटतोय मिळून येईल का व गोळे नीट राहतील का पाण्यात की विरघळतील>>>
विरघळत नाही म्हणा कारण दही आणि तांदळाचं पीठ पुरेसे बायंडिंग चे काम करते. पण तरीही अगदीच गरज वाटल्यास हात ओला करून मुठे वळा. जरा ओलावा येईल.
हे असले काही देत जाऊ नका. एक
हे असले काही देत जाऊ नका. एक तर नको तितकी भूक लागते. त्यात राहता कुठे माहीत नाही ना संपर्क क्रमांक माहिती! त्यात आय डी मनी म्याऊ!
तुमच्याकडे हा पदार्थ खायला रोज तीस पस्तीस माणसे येवोत आणि त्यामुळे तुमचे डोके फिरो
@बेफिकीर
@बेफिकीर

तुमच्याकडे हा पदार्थ खायला रोज तीस पस्तीस माणसे येवो,>>>>>
भागीदारीत हॉटेल काढुया का???
कैरीच्या कढी रेसिपी युनिक
कैरीच्या कढी रेसिपी युनिक वाटते आहे.
मला एक शंका आहे . खोबऱ्याच्या वाटाणमध्येच बेसन भाजून घ्यायचे की वेगळे भाजून मग मिक्स करायचे ? कारण वाटणमध्ये कळणार कसे बेसन खरपूस भाजले गेले आहे की नाही ?
>>>खोबऱ्याच्या वाटाणमध्येच
>>>खोबऱ्याच्या वाटाणमध्येच बेसन भाजून घ्यायचे की वेगळे भाजून मग मिक्स करायचे ? >>>
खोबऱ्याचे वाटण कोरडे आहे. ते आधी परतायचे मग त्यालाच बेसन लावायचे.
कारण वाटणमध्ये कळणार कसे बेसन खरपूस भाजले गेले आहे की नाही ?>>>
बेसन भाजले गेले की खमंग घमघमाट सुटतो.
पुन्हा इतक्यात कढी केली की या स्टेप चा फोटो काढून इथे देते. म्हणजे कल्पना येईल.
अच्छा ओके
अच्छा ओके
प्रचंड टेंम्प्टिंग दिसतोय
प्रचंड टेंम्प्टिंग दिसतोय पदार्थ. मी एका मैत्रीणीकडे अनेक वर्षांपूर्वी खाल्लाय गोळा भात. चविष्ट होता.
आज रेस्पी मिळाली एकदाची
बेफिकीर
गोळा भात माझ्या (
गोळा भात माझ्या ( विदर्भातल्या) सासरी एकदम कम्फर्ट फूड. गोळ्यात ओवा, आले, लसूण घालतात माझ्या साबा. आणि मोहन न घालता कच्चे च तेल, दही आणि अगदी लागले तर किंचित पाणी घालून मळतात. मोहन घातल्यामुळे गोळे लाइट होत असतील कदाचित, गच्च न होता. घालून बघेन आता नेक्स्ट टाइम.
कैरीची कढी ऐकूनच माहित होती. ही रेसिपी मस्त वाटते आहे.
मस्त पदार्थ आहे. मी इथेच
मस्त पदार्थ आहे. मी इथेच रेसिपी बघून पूर्वी गोळा भात केलेला आहे. आता कढीबरोबर करुन बघेन.
कैरीची कढी नाविन्यपूर्ण दिसते
कैरीची कढी नाविन्यपूर्ण दिसते आहे, ही रेसिपी हिट होणार आमच्याकडे 👍
गोळाभात एकदा नागपुर भेटीत स्थानिक कुटुंबाने खास मेजवानी म्हणून केला होता. It was one sad experience, नव्हता आवडला अजिबात. मे बी माझ्या अपेक्षा जास्त होत्या. फार कोरडा घश्यात अडकणारा प्रकार होता.परत कधी खाण्याचे डेरिंगच केले नाही मग. 😀
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
वडाभात आणखी निराळा ना? ते वडे तळलेले असतात, मला वाटतं?
मला कैरीची कढी इथल्यासारखी नारळाच्या दुधातली आवडते.
मिक्स डाळीचे वडे करुन तेही
मिक्स डाळीचे वडे करुन तेही असेच भातावर कुस्करून घेतात, वर हिंगाचे तेल. भजी / पकोडे ही असेच खातात भातासोबत.
गोळाभात फार साहित्य न लागता चटकन होईल असा मेनू. तिकडे कडक उन्हाळ्यात भाज्या फार चांगल्या मिळत नसतील तेव्हाही बरा पडतो.
मेजवानी म्हणून चला तुम्हाला खास नागपुरी पदार्थ खाऊ घालतो म्हणून आवर्जून खाउ घालावा असा हा पदार्थ नाही. नक्कीच अपेक्षा भंग होणार
छान आलाय फोटो,कैरीची कढि
छान आलाय फोटो,कैरीची कढि नक्की करणार..गोळा भात पण करेल थोडा..
माझ्या साबा पण विदर्भातल्या (मलकापुर) त्याना कढि-गोळे आवडायचे, साधा भात त्यावर गोळा फोडून आणी वरुन फोडणीच तिखट तेल.. गोळा भात्,वडा-भात प्रकार नव्हते आवडत..पण वडे,भजि,आलु बोन्डे हे खुप आवडते..
वाह मस्तच.
वाह मस्तच.
कैरीची कढी किंवा सार थोड्या वेगळ्या प्रकारे करते पण नागपुरी गोळा भात फक्त ऐकून आहे, कधी केला नाही किंवा कुठे खाल्ला नाही.
असा असतो का गोळा भात!
असा असतो का गोळा भात!
छान रेसिपी. कैरीची कढी अशी
छान रेसिपी. कैरीची कढी अशी करून पाहेन.
मी रुचिरामध्ये दिलेल्या कृतीनुसार गोळा भात करत आलोय. आवडतो.
फोडणीवर बेसन भाजून घ्यायचं. त्यात दाण्याचं कूट, सुकं खोबरं, तिखट मीठ इ. घालून सुपारीएवढे गोळे करायचे.
तांदूळही तेलावर परतून शिजत ठेवायचा. भात मोकळा होण्यासाठी लिंबाचा रस घालायचा. भात अर्धवट शिजत आला की त्यात गोळे घालून ढवळून शिजवायचं. खाताना पुन्हा वरून फोडणी - जी मी घालत नाही.
< मुठीमध्ये घट्ट वळल्यास बेसनाचा मुठा तयार झाला पाहिजे. > - याला गुजरातीत मुठ्ठी पडतू मोहन म्हणतात.
मध्यंतरी आमच्या एका नागपुरी
मध्यंतरी आमच्या एका नागपुरी मित्रांकडे खाल्ला. भारी होता. त्याच्याबरोबर चिंचेचं सार होतं पण. ते पण फार भारी होतं.
मस्त फोटो आणि रेसिपी! कैरीची
मस्त फोटो आणि रेसिपी! कैरीची कढी नक्की करुन बघेन. बेसनाचे गोळे मात्र न मोडता शिजवणे जरा चॅलेंजिंग वाटत आहेत.
मस्त फोटो आणि कृती. नक्की
मस्त फोटो आणि कृती. नक्की करून बघणार.
कालच या रेसिपीने कैरीची कढी
कालच या रेसिपीने कैरीची कढी केली होती .छान झाली होती . भाजताना बेसन थोडे जळाले त्यामुळे फोटोजेनिक झाली नाही . चव चांगली होती मात्र.
धन्यवाद मनिम्याऊ
धन्यवाद मनिम्याऊ
गोळा भात मस्तच आहे रेसिपी. जमेल का नाही माहित नाही पण कैरीची कढी करणार. टेम्पटिंग.
भारी रेस्पी. शक्यतो तेला
भारी रेस्पी. शक्यतो तेला-बेसनाच्या पदार्थानंसोबत आंबट काही पातळसर प्रकार असतो, त्यामुळे तेलाचा त्रास होत नाही असे म्हणतात. अर्थात ते बरोबरही असलं पाहिजे. कारण खरंच त्रास होत नाही असा माझातरी अनुभव आहे.