भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_2025-04-12-19-09-36-16_92460851df6f172a4592fca41cc2d2e6.jpg

खास तुम्हा सर्वांसाठी हा मिनीचा फोटो.
नाही तर मी शक्यतो फोटो नाही शेअर करत...
पण इथे सगळे आपलेच आहेत Happy

माझा मुलगा जणू मांजर मॅग्नेट आहे. तो खूप वेळा आजारी माऊ घेऊन येतो घरी.
मग आम्ही त्यांना नीट बरे करून ज्यांना हवीत त्यांना देतो. मिनी खूपच छोटी आणि आजारी होती मग आम्हीच ठेवून घेतली... खरं सांगायचे तर तिला द्यायचा विचार पण कधी आला नाही.

सायो, CDS= cat distribution system Happy
The idea is that, when a person is ready to welcome a cat into their life, the universe (or the cat distribution system) will somehow present them with a stray or adoptable cat.

क्यूट आहे मिनी!
माझी मुलगी कॉलेज मधे आहे आणि सध्या शेअर्ड अपार्ट्मेन्ट मधे रहाते. ही त्यांची माऊ : फिओना!! खरं तर मैत्रिणीची आहे पण आता दोघींची Happy
तिची आवडती जागा बघा ! सॅसी गर्ल Happy आत्ताच बाहेरून येऊन ज्वेलरी उतरवून ठेवली आहे असे वाटतेय Happy
fiona.jpeg

खरंच सॅसी गर्ल.
माझा मुलगा जणू मांजर मॅग्नेट आहे. तो खूप वेळा आजारी माऊ घेऊन येतो घरी.>>> धनवन्ती, मस्त वाटलं वाचून. Happy मिनीही गोजिरवाणी आहे.
सिमरनचे घिबलीही मस्त.

धनवन्ती, खूपच छान काम केलेत. विशेष कौतुक.
मिनीचा फोटो पण मस्त. विश्वास नाही बसत ते वरती लिहिलेलं सगळं हिच्याबद्दल होतं. Happy

मै, फियोना एकदम gorgeous आहे!

IMG_20250412_213405.jpg

सर्वांना खूप धन्यवाद _/\_

ही मिनी, जेव्हा सापडली होती तेव्हा... खूप मलूल होती पण तिच्या डोळ्यात खूप आर्त भाव होते. आणि २ ते ३ मिनिटात अशी काही बिलगली की जणू खूप जुनी ओळख आहे.

बाप रे! केवढ छोटस पिल्लु होत...आता छान झालिये..लव्ह अ‍ॅन्ड केअर चेन्ज एव्ह्ररीथिन्ग
सॅसी गर्ल पण भारी

घिबली इमेजेस खूप गोड आहेत

धनवंती दंडवत
फार छान काम केलेत
मिनी गोड आहे

फियोना एकदम "पू" लेव्हल stylish हां

Pages