मस्त जुळतं आमचं!

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 20 March, 2025 - 14:33

मस्त जुळतं आमचं!

तीचं ते नाजूक हसणं…
ब्रेकफास्टवेळी टेबलावर हसून चांदणे सांडणे,
सगळं काही नजरेत साठवले मी!

तिची ती उंची,
गोरापान रंग, बोलण्याचा ढंग—
अप्सराच जणू!
फिदा झालो मी तिच्यावर…

तिचे ते मोकळे केस,
स्टायलिश राहणे,
इंग्लिश बोलणे—
अहाहा!

मला दाढी ठेव सुचवणे,
हेअरस्टाईल बदलायला लावणे,
“फॉर्मलपेक्षा कॅज्युअलवर छान दिसशील” सांगणे…
कसला संकेत?

सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण
आणि संध्याकाळची कॉफी—
आम्हाला एकमेकांची सवयच झालीय!

टीम्स मिटिंग असो की
एखादा इवेंट,
आमचे लाडिक विनोद सुरूच असतात.

मागे मला मिळालेले गिफ्टही
मी तिला देऊन आनंदी केले.
ऑफिस कलीग हा फक्त
आमच्यातला अडसर आहे,
खरं तर आम्ही दोघं एकच आहोत!

काय झालं माझं लग्न झालंय म्हणून?
पूर्वी नाही का लोक दोन बायका करायचे?
मी आज ठरवलंच—
हिला विचारणारच!

मनात शंभर विचार चालू होते.
तिचा रिप्लाय?
ती काय म्हणेल?
पण नाही, मला तिच्या नजरेतला तो “हो” स्पष्ट दिसतो!

हिंमत करून मी तिला मॅसेज टाकलाय.
आता दोन तासांनी व्हॉट्सअप उघडणार!
आहाहा, काय आनंद!
तोपर्यंत ही माझी तासाभराची
टीम्स मिटींगही आटपेल!

झाली एकदाची मिटिंग!
हुश्श!

अरे… पण हे एचआर हेड
माझ्या टेबलाकडे का येताहेत?
त्यांच्या हातातला हा बंद लिफाफा?
आणि… सोबत सिक्युरिटी गार्ड?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम जमलीय.
शेवटचा ट्विस्ट तर खतरनाक...
ह्या केसेस खूप वाढल्यात हल्ली...

मस्तंय. Lol

पण तीच ते नाजूक हसने>> हे असं का लिहलय?
तीचं ते नाजूक हसणं... असं हवं.

शीर्षकाचा संबंध कळला नाही?
मला आधी वाटलं..की नवरा बायकोचं कसं मस्त जमतं ( उपरोधिक पणे, अर्थातच!).. तेच लिहिले आहे...
Happy

मस्तय Lol
पूर्वी नाही का लोक दोन बायका करायचे?
मी आज ठरवलंच—
हिला विचारणारच!>>तेव्हाच कळलं याचा निरोपसमारंभ होणार पण सिक्युरिटी गार्ड Lol Lol