ये गं ये गं चिमणे गं

Submitted by चंद्रहास शास्त्री on 20 March, 2025 - 02:04

ये गं ये गं चिमणे गं
- हसरा चन्द्र.

ये गं ये गं चिमणे गं
घरट्यात लवकरी
संध्याकाळ झाली फार
वाट तमाची अंधारी

पश्चिमेसी गेला भानू
चारा आणलासे घरी
वाट तुझी पाहतो मी
ये गं सखे लवकरी

जाऊ नको फार दूरी
सिमेंटच्या अरण्यात
स्वच्छंद विहार येथे
तिथे नार्थ जगण्यात

इथे सारी चिव चिव
तिथे फक्त काव काव
नको ओलांडू तू शीव
येगं सखे चिव चिव

बरे झाले आलीस तू
पूर्ण चंद्र आता पाही
सखे, मी तुझा विठ्ठलु
तूच माझी सखी राही

काड्यांचा गं हा संसार
स्वाभिमानाचे गं सार
साथ देऊ आर पार
जन्मोजन्मींचा संस्कार

Group content visibility: 
Use group defaults