बाप

Submitted by Vishal Madhav Vaidya on 17 March, 2025 - 20:28

डोळे फोडतो दिवस रात्र तो असतो बाप
किती आहे बालका त्यांच्या जीवाला रे त्रास
कुटुंबाच्या सोईसाठी नेहमी धडपडत राहतो
स्वतःच्या अस्तित्वाच भान विसरून जातो....
पाई पाई जमा करून भरतो लेकरांची पोट
महिन्याच्या शेवटी पर्यन्त राहत नहीं खिशात नोटं
मुलाबाळांच्या इच्छा करतो प्रत्येक पूर्ण
स्वतःच्या इच्छा मात्र ठेवूनं अपूर्ण....
कुटुंबाच्या भल्यासाठी रात्र बे रात्र जागतो
दुःख सारे कुटुंबाचे तो एकटाच सोसतो
दुःख आपले सारे सागतं नाही कुणाला
होईल सगळं ठीक सांगत राहतो मनाला...
किती रे दैनं आहे त्यांच्या जीवाला
राहुदे आनंदात नेहमी त्यांच्या मनाला
सात जन्म ही फिटणार नाही असे त्याचे उपकार
होऊन यशस्वी लेका तु बनं त्यांचा आधार...

Group content visibility: 
Use group defaults