Submitted by Vishal Madhav Vaidya on 15 March, 2025 - 21:42

या जन्मी नाही झालीस माझी,
पुढल्या जन्मी होशील का ?
नाही मिळालं प्रेम तुझं,
पुढल्या जन्मी देशील का ?
ऋण आहे खूप तुझें माझ्यावर,
फेडायला मला मिळतील का ?
या जन्मी नाही मिळाला हक्क तुझ्यावर,
पुढल्या जन्मी तो देशील का ?
चूक माझी सुधारायला,
मौका मला देशील का ?
मिठीत तुझ्या मिठीत मला,
कधी तरी गं घेशील का ?
श्वास माझा श्वासात तुझ्या,
सहवासात मला घेशील का?
कधी तरी गं दूर तू ,
भेटायला मला येशील का ?
पुढल्या जन्मी नक्की तू,
माझीच फक्त होशील का ?
पुढल्या जन्मी नक्की तू,
माझीच फक्त होशील का ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुझ्याविना जगण्याचा मार्ग मी
तुझ्याविना जगण्याचा मार्ग मी शोधतोय,
काय माहिती प्रत्येक वेळी अपयशी का ठरतोय?
तुझ्या आठवणींचा सार माझ्या मनात आहे,
घर तुझ्या आठवणींच मझ्या तनातनात आहे...
डोळे असे तिचे चिंब, जसे
डोळे असे तिचे चिंब, जसे पाण्यामध्ये प्रतिबिंब
ओठांवर तिच्या असा साज होता, जसा पक्षांचा चिवचिवाट होता
कपाळाच्या आढ्यावर ती वेगळीच वाटायची,
रागात असल्यवर मला ingore करायची
ओठावर तिच्या एक वान होता,
तिला नजर न लागण्याचा तो साज होता
हसलेली मला ती खूप आवडायची,
कधी कधी तिची मला भीती पण वाटायची
ती रूसायची, चिडायची, रडायची,
मनवायला तिला मजा पण यायची
स्वतःपेक्षा जास्त प्रेम माझ्यावर करायची,
रागाच्या भरात काही पण बोलायची
प्रेम ती माझ्यावर खूप खूप करायची,
माझ्या प्रत्येक गोष्टीत सोबत असायची
ती आहे जे ते खरंच बोलायची,
तिची तीच गोष्ट मला खूप आवडायची
मला बोलायला तिला खूप आवडायचं,
आणि तिला ऐकून मी मोहित व्हायचं
मी खरचं खूप नशीबवान आहे,
तिच्यासारखी माझ्याकडे सोबती आहे
कसे हे दिवस गेले ते आम्हा कळलेच नाही,
प्रवास मात्र हा आठवणीत आमच्या येत राहील...
कविता करायचे सोडून जिम वगैरे
कविता करायचे सोडून जिम वगैरे जॉइन कर. होईल तुझी ती. इन्स्टा वर कसले बाप्ये बघत असती विचार तिला. तुझ्या कविता कुठं लागायच्या तिला?