मिशन फ्लोरा - भाग २

Submitted by अविनाश जोशी on 15 March, 2025 - 07:39

मिशन फ्लोरा - भाग २
लॅब मॉड्युल ने प्रथम बाहेरचे तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, आद्रता इतर धोकादायक वायू अशा सर्व गोष्टींचे प्रमाण शोधले. त्याबरोबरच हवेत कोणताही ज्वलनशील वायू अथवा विषारी वायू नाही याची खात्री करून घेतली. त्यानंतर तिसरे मॉड्युलही HJB २७ वरून मागवून घेण्यात आले. स्टॅंडर्ड प्रोटोकॉलप्रमाणे शेरलॉक २३५ चा बाहेरच्या ग्रहाशी सबंध येऊन देणे हे सर्वात लांब असलेले काम होते. तिसरे मॉड्युल उरल्यावर त्यातून शंभर यंत्रमानव सैनिकांची तुकडी बाहेर पडली. त्याच्यात चार लेफ्टनेंन दर्जाचे अधिकारी असून या सर्वांवरचे नियंत्रण तान बून हॉक हाच शेरलॉक २३५ वरून करत होता. प्रथम त्यांनी सैनिकांच्या चार तुकड्या करून त्या एक फूट , आठ फूट , वीस फूट , आणि पन्नास फूट या उंचीवरून पॉप्लर वृक्ष समूहात सोडले. आश्चर्याची एक गोष्ट म्हणजे या पॉप्लर वृक्षांना अगदी छोट्या व्यासाच्या अकरापासून ते दोन इंची व्यासाच्या अकारापर्यंत असंख्य तंतू (टेन्ड्रिल्स) लोंबत होते. या तंतूकडे सेन्सिंग आणि मोटर नर्व्हर्स असे दुहेरी काम असावे. यंत्रमानव झाडीत शिरल्यावर पहिल्या तीन चार झाडांच्या तंतू नी त्यांचे लांबून आणि स्पर्श करून निरीक्षण केले. त्यांना काहीही इंटरेस्टिंग वाटले नाही आणि त्यामुळे पुढच्या सर्व वृक्षांनी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. दुसरी तुकडी पॉप्लर वृक्षांच्या जमिनीवरून गेली. असंख्य कीटकांचे साम्राज्य त्यात होते. तिसरी तुकडी प्राणी असणाऱ्या दुसऱ्या विभागातून पन्नास फुटावर गेली. चौथी तुकडी पाण्यावरून सर्वेक्षण करायला गेली. हे सर्वेक्षण सुमारे फ्लोराच्या तीन दिवसापर्यंत चालले होते (म्हणजेच पृथ्वीवरचे २४ तास ) अंधार पडल्यावर सर्व पाहणी इन्फ्रारेड कॅमेराने होत होती. झालेली माहिती HJB २७ च्या कॉम्पुटरवर व नंतर जागतिक संघटनेच्या महासंगणकवर जात होती. तीन दिवसाच्या पाहणीत कुठलेही धोकादायक आढळले नाही. त्यामुळे फ्लोराचे गूढ, गूढच राहिले. त्यानंतर सर्व यंत्रमानव परत बोलवण्यात आले. अजूनही मानवाने ग्रहावर पाऊल ठेवले नव्हते. या पहिल्या तपासणीनंतर डेंजर अलर्ट तीनवर ठेवण्यात आला. आता पाळी होती अतिशय छोट्या अशा ड्रोनची. या ड्रोन्सच्या दोनशे तुकडी पैकी पन्नास ड्रोनवर वेगवेगळ्या तर्हेचे मांस ठेवले गेले होते. पन्नास ड्रोन्सवर विविध पक्षांची अंडी ठेवली गेली होती. पन्नास ड्रोनवर झाडपाला बसवला गेला होता तर पन्नास ड्रोन रिकामे होते. हे रिकामे ड्रोन दीडशे ड्रोनचे छायाचित्रीकरण करणार होते आणि ते शेरलॉकवर आणि जागतिक संघटनेकडे जाणार होते. ड्रोन पाठवताना ते पुरेसे मिसळण्यात आले होते आणि निरीक्षणासाठी गेलेले पन्नास ड्रोन या दीडशे ड्रोन च्या वेगळ्या लेवल वरून जाणार होते. हे ड्रोन फक्त पॉप्लर वृक्षांची दाटी असलेल्या वाटेवरूनच जाणार होते. सुरवात झाल्याबरोबर ड्रोनवरचे मांस झाडावरच्या तंतू नी उचलले. त्यात काही बळकट तंतू नी ड्रोन सकट उचलले. अंड्यांची तशीच वाताहत झाली. कुठल्याही झाडांनी गर्दी किंवा गोंधळ घातला नाही. त्यांनी शेवटचा ड्रोन सेन्स करून सर्व ड्रोन वरच्या मांस व अंडी वेगवेगळ्या झाडांनी एकदम उचलले. मांसात वृक्षांनी कुठलाही भेदभाव केला नाही त्याचप्रमाणे अंड्यातही काही भेदभाव दिसला नाही. झाडपाल्याला मात्र कुठल्याही तंतू ने बोट सुद्धा लावले नाही. त्यानंतर गडद अंधारात हा प्रयोग परत करण्यात आला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chan