Submitted by चंद्रहास शास्त्री on 13 March, 2025 - 06:27
वेडेपण
- हसरा चन्द्र
वेडेपणच सखे, हरवले तुझे ते
हासरे लाजरे, गजरेच तुझे ते
कृष्णनभात सखे, चंदेरी अलके
शोभती कसे ते, सोबती तुझे ते
चांदणे लाजले, आजही तसे ते
जुने बहाणे ते, उखाणे तुझे ते
प्रकृती बोलते, मानही डोलते
आजही नवे जे, आभाळ तुझे ते
काकणे हातचे, आजही नादते
वेड रेंगाळते, अंतरी तुझे ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा