
ज्युलिया आर्न्डट म्हणतात की, कामाशी संबंधित प्रत्येक मेसेज आणि ईमेलला लगेच उत्तर देऊ नका. जेव्हा तुम्ही प्रत्येक मेसेज आणि ईमेलला त्वरित उत्तर देता, तेव्हा तुम्ही खालील गोष्टींची इतरांना सवय लावता:
- तुमचा वेळ नेहमीच उपलब्ध आहे.
- तुमच्या मर्यादा लवचिक आहेत.
- तुमचं लक्ष तुमच्या प्राधान्यावर केंद्रित नाही.
हे केवळ उत्पादकतेबद्दलच संबंधित नाही तर हे आत्म-सन्मान आणि स्वत:ची ऊर्जा व्यवस्थापनाबद्दल आहे.
खरी समस्या आपल्याला दिवस रात्र येणारे कामसंदर्भातील भरपूर मेसेज आणि ईमेल ही नाही, तर त्यामागे असलेल्या भीतीची आहे. ते कसे?
- आपण ऑफिसमध्ये निरुपयोगी होऊ अशी भीती.
- कोणाला तरी नाराज करण्याची भीती.
- एखादी संधी गमावण्याची भीती.
तुम्ही या चक्रात अडकले आहात याचे कारण?
याचे कारण असे आहे की तुम्हाला असं शिकवलं गेलं आहे की, "ऑफिस मेसेज किंवा इमेलचे लगेच उत्तर देणे" म्हणजेच "तुम्ही ऑफिसमध्ये मूल्यवान असणे".
पण तुमचं मूल्य हे केवळ प्रतिसादाच्या वेगावर ठरत नाही. ते ठरतं तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर, नेतृत्वक्षमतेवर आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या क्षमतेवर!
तर मग अशा परिस्थितीत काय करावं?
- मेसेज किंवा ईमेल तपासण्याकरिता आणि त्याला उत्तर देण्यासाठी ठरावीक वेळ निश्चित करा.
- आपल्या सहकाऱ्यांना आणि व्यवस्थापनाला तुमच्या कामाच्या मर्यादा स्पष्टपणे सांगा.
- प्रतिसाद देण्यापूर्वी थोडा वेळ थांबा आणि स्वत:ला विचारा, "हे अगदी आताच अत्यावश्यक आहे का? की यावर काही वेळानेसुद्धा काम होऊ शकतं?"
असं केल्याने तुम्ही केवळ तुमची ऊर्जा संरक्षित कराल असं नाही, तर इतरांनाही तुमच्या वेळेचा आदर करायला शिकवाल.
हे सांगणे म्हणजे काही मुद्दाम स्वत:ला इतरांसाठी कमी वेळ उपलब्ध करायला उद्युक्त करणे नव्हे. जर तुम्हाला तुमच्या जीवनाशी सुसंगत असे करियर घडवायचे असेल, तर इतरांच्या प्राधान्यक्रमानुसार नेहमीच प्रतिसाद देऊन ते कधीच साध्य होणार नाही.
सातत्याने कामासाठी उपलब्ध असणे ही तुमची ताकद नाही, तर उलट ती थकवा आणि मानसिक तणावाकडे जाण्याचा आणि आजारी पडण्याचा मार्ग आहे. कामाच्या ठिकाणी जर तुमची दिवस रात्र सतत उपलब्धता आवश्यक असेल किंवा गृहीत धरली जात असेल किंवा त्याला पर्यायच नसेल तर मात्र त्याला टॉक्सिक वातावरण म्हटले जाते आणि शक्य असल्यास असे ठिकाण सोडून देणे योग्य!
( "Success without Burnout" by Julia Arndt चा स्वैर अनुवाद)
किती टुकार लिहिता हो तुम्ही
किती टुकार लिहिता हो तुम्ही
किती टुकार लिहिता हो तुम्ही
किती टुकार लिहिता हो तुम्ही
बरेचदा असे झालंय की एखाद्या
बरेचदा असे झालंय की एखाद्या इमेलला आपण लगेच उत्तर द्यायला घेतले, आपण देत असणारा तोडगा नीट लक्षात यावा यासाठी काही अटॅचमेट्स शोधल्या, स्केचेस तयार केले आणि आपण सेंड करण्या आधीच तिकडून त्यावर त्याच व्यक्तीचा मेसेज आलाय "OK, I could resolve it, but now I am facing another problem.......".
पटलं
पटलं
सध्याच्या कॉपोर्रेट
सध्याच्या कॉपोर्रेट कल्चरमध्ये बर्न औट न होणे हेच सक्सेस आहे.
@ मेल्स रिप्लाय - जर तसाच साईट इश्यू असेल किंवा लाल झेंडा असेल, किंवा पाठवणाऱ्याने तशीच रिक्वेस्ट केली असेल, किंवा मेल वर नुसते confirmation किंवा आपल्याकडची एखादी इन्फॉर्मेशन attachment काही स्टडी न करता जोडून पाठवायची असेल तरच लवकर रिप्लाय द्यावा. अन्यथा अनरीड करून सोडून द्यावा. दुपारनंतर आलेल्या मेलला तर ढुंकून सुद्धा बघू नये. शुक्रवारी सकाळी आलेले मेल सुद्धा बाजूला ठेवावेत. विकेंडला आणि कामाला शक्यतो एकमेकांपासून दूरच ठेवावे. सोमवार तसेही लागलेल्या आग विझवायचा दिवस असतो. त्यात आणखी एखादी वाढली तर फार काही हात पोळत नाहीत.