Submitted by च्रप्स on 2 March, 2025 - 22:21
आणखी एक ड्रिंक घेऊया,” ती म्हणाली.
“नको, मला बाईक चालवायची आहे,” तो म्हणाला.
“मी नाही चालवू शकणार,”
ती म्हणाली. “चिंता नको, मध्यरात्री आहे, ट्रॅफिक नाही.”
त्यालाही प्यायचं होतं, म्हणून त्याने प्यायलं. दोघंही टुन्न. कसंबसं त्याने बाईक सुरू केली, ती मागे बसली. तोल गेला पण तो सावरला. मुख्य रस्त्यावर घेताना स्कूटरला धडकायचा बाकी होता.
“तू डावं-उजवं बघितलंच नाहीस!” ती ओरडली.
आरशात पाहिलं—मागून पोर्शे भरधाव येत होती…
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संयोजक -हे शशक स्पर्धे च्या
संयोजक -हे शशक स्पर्धे च्या लिस्ट मध्ये टाका प्लिज...
नोट - संपूर्णपणे काल्पनिक कथा
नोट - संपूर्णपणे काल्पनिक कथा ...
डावं उजवं न बघता गेले तर
डावं उजवं न बघता गेले तर समोरुन पोर्शे यायला हवी ना? रेअर व्हू मिरर मध्ये कशी दिसेल? का पोर्शेने पण डावं उजवं बघितलेलं नाही?
बाकी पोर्शे मागून आली तर कडेकडेने निघुन जाईल की! धडकण्याचे चांसेस दोघेही प्यायलेले असले तर शून्यवतच.
डावे उजवे न बघता मेन
डावे उजवे न बघता मेन रस्त्यावर घातली... भरधाव येणाऱ्या पोर्श ला यिल्ड न देता.. असे आहे ते...