मभागौदि २०२५ शशक-दुःखाचे मूळ -शर्वरी-

Submitted by -शर्वरी- on 26 February, 2025 - 17:37

“या जडशीळ खादाडाला उचलून थेट नदीत टाकला पाहिजे.”
“रोज रोज त्याच्या शक्तीचे कौतुक ऐकायला नको.”
“ दिवस रात्र त्याला घाबरून रहायला नको”.
“यापुढे कधी त्याला पहायलाही नको.”
“प्रत्येक गदायुद्धात हा पहिला येणार! “
“आणि कौरवांचा युवराज कायमच दुसरा!”
“एकदा भीमसेनाचा काटा काढला की, राज्य, गादी आणि अधिकार केवळ कौरवांचाच असेल!”
“ खरंतर, लढाईतच हरवला पाहिजे या शंभर हत्तींचे बळ असणा-या पंडुपुत्राला.”
“पण तेच तर नाही ना जमत भावा!”
“मग जमेल ते करु. त्याला लाडू आवडतात तर लाडू खायला घालू.”
“आणि लाडू मधून विष.”
“मग देऊया टाकून नदीमध्ये.”
“विषाने नाही मेला तर बुडून नक्की मरेल”

काय म्हणावे? राजगादीचा मोह, संपत्तीचा मद की बलाचा मत्सर?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users