मभागौदि २०२५ शशक - माहिती

Submitted by बिपिनसांगळे on 26 February, 2025 - 11:27

ती त्याच्या कुशीत शिरली. आसुसून. ऐसपैस डबलबेडवर.
शेजारी आडव्या पडलेल्या तिच्याकडे त्याने आडव्याच अवस्थेत डोळे भरून पाहिलं. त्याला खरंच वाटत नव्हतं की ती आता या क्षणाला त्याच्या शेजारी आहे म्हणून. तेही ...
ती मादक तर होतीच अन हसलीही तशीच. त्याच्या मऊ केसांतून हात फिरवत ती म्हणाली ,'मला तुझ्याबरोबर एन्जॉय करायचंच होतं... '
'अरे वा ! ते का म्हणून ? '
'कारण तू एकदम एक्सपर्ट आहेस म्हणे या बाबतीत !'
'अच्छा ? अन तुला ही माहिती सांगितली कोणी ? '
तो विचारात पडला.
ती पुढे म्हणाली.'ज्या व्यक्तीला कुठे आणि काय बोलावं ते कळत नाही, तिने .'
'कोण ?'
'तुझी बायको !...'

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol

छान Lol

Lol मस्त आहे.

'अरे वा ! ते का म्हणून ? ' >>> असा प्रश्न त्या वेळेस विचारणार्‍याच्या ब्रिलियन्स बद्दल अपार खिन्नता आली Happy

'अच्छा ? अन तुला ही माहिती सांगितली कोणी ? ' >>> या प्रश्नानंतर प्रेयसी सुद्धा विचारात पडायला पाहिजे. म्हणजे ही माहिती त्याच्या बायकोखेरीज अजून कोणाला आहे? Happy हा प्रश्न मुळात पडायलाच नको Happy

याची उलट व्हर्जनही डोक्यात आली. तो प्रत्यक्षात एक्सपर्ट नाही आणि यांची लफडेबाजी बघून बायकोनेच ही चाल खेळली, की तिचाही एकदाचा भ्रमनिरास होउ दे आणि त्यामुळेही हे लफडे बंद होईल Wink

मस्त.
फारएण्डचा प्रतिसाद मस्त.

मस्तच......
कथेच्या शेवटी फक्त "अ..ह.." लिहायला हवं होतं.